आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय आंब्यांना जगभरात मागणी आहे. खास करून अमेरिकेत याबाबत खूप उत्सुकता असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भारतातून आंब्याच्या आयातीवर निर्बंध लावले होते. नुकतीच अमेरिकेने पुन्हा या आयातीस मंजुरी दिली आहे. राजस्थानच्या रावतभाटामध्ये बनणाऱ्या किरणोत्सर्ग स्रोताच्या मदतीने फूड इरॅडिएशन प्रक्रियेतून गेल्यानंतर हे आंबे अमेरिकेला पाठवले जात आहेत.
कोटाजवळील रावतभाटामध्ये बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नलॉजीच्या (ब्रिट) कोबाल्ट फॅसिलिटीत कोबाल्ट ६० किरणोत्सर्ग स्रोत बनतो. हा स्रोत फूड इरॅडिएशनसाठी फूड प्रोसेसिंग प्लँटला उपलब्ध करून दिला जातो. तिथे खाद्यपदार्थ बॅक्टेरिया, व्हायरस आणि कीटकरहित असतात. रावतभाटा येथून किरणोत्सर्ग स्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख केंद्रांना उपलब्ध करून दिले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, वापी, गुजरातमधील अहमदाबाद, कर्नाटकमधील बंगळुरू येथील केंद्रांचा समावेश आहे. २०१९ मध्ये (कोरोनापूर्वी) अमेरिकेला १०९५ टन आंबा निर्यात करण्यात आला होता. आंबे विमानाने पाठवले जातात. यंदा ११०० टन म्हणजे सुमारे ३९ कोटी रुपयांचा आंबा पाठवला जाईल. अमेरिकेत भारतीय आंब्यांना सर्वाधिक किंमत मिळते. बाजारपेठेत आंब्याची आवक मार्चमध्ये सुरू होते. ऑगस्टमध्ये ती संपते.
आयोनाझिंग रेडिएशन टाकल्यावर पूर्णपणे सुरक्षित होतात खाद्यपदार्थ
खाद्यपदार्थांवर आयोनायझिंग रेडिएशन टाकल्याने त्यातील मायक्रोऑर्गनिझम, बॅक्टेरिया, व्हायरस आदी नष्ट होतात. या प्रक्रियेला खाद्यपदार्थांचा किरणोत्सर्ग म्हटले जाते. अमेरिका त्यांच्या देशात कोणत्याही प्रकारे असुरक्षित खाद्यपदार्थांची आयात करत नाही. त्यामुळे या प्रक्रियेतून गेल्यानंतरच पदार्थ किंवा वस्तू पाठवल्या जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.