आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Money In Swiss Banks Rises 47.3% To 14 year High, Reaching Rs 30,500 Crore By 2021

स्विस बँकांत भारतीयांचा पैसा सर्वोच्च पातळीवर:2021 च्या अखेरीस 30,500 कोटींवर रक्कम, तब्बल 47.3 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली/झ्युरिच11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी स्विस बँकांत जमा केलेली रक्कम २०२१ च्या अखेरीस ४७.३% वाढून ३.८३ अब्ज स्विस फ्रँकवर (३०,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त) पोहोचली आहे. ती गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक रक्कम आहे. वर्ष २०२० च्या अखेरीस स्विस बँकांत भारतीय ग्राहकांचे एकूण २.५५ अब्ज स्विस फ्रँक (२०,७०० कोटी रुपये) जमा होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी त्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. ही माहिती स्वित्झर्लंडच्या स्विस नॅशनल बँक (एनएसबी) या केंद्रीय बँकेद्वारे गुरुवारी जारी वार्षिक आकड्यांतून समोर आली आहे.

भारतीयांच्या स्विस बँकांतील जमा रकमेत वाढ सेक्युरिटीज, बाँड आणि अशाच अन्य इन्स्ट्रुमेंट्समध्ये वाढ झाल्याने झाली आहे. भारतीय ग्राहकांच्या बचत किंवा डिपाॅझिट खात्यांत जमा रक्कम दोन वर्षांची घसरण रोखत जवळपास ४,८०० कोटी रुपयांनी वाढली आहे आणि ती सात वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. २०२१ अखेरीस भारतीय ग्राहकांच्या बाबतींत स्विस बँकांची एकूण देणी ३८३.१९ कोटी स्विस फ्रँक आहे. त्यात ६०.२ कोटी स्विस फ्रँक ग्राहकांच्या डिपाॅझिटच्या रूपात आहेत. डिसेंबर २०२० च्या अखेरीस हा आकडा ५०.४ कोटी स्विस फ्रँक होता. दुसरीकडे, १२२.५ कोटी स्विस फ्रँक इतर बँकांमार्फत ठेवण्यात आले आहेत. २०२० च्या अखेरीस हा आकडा ३८.३ कोटी स्विस फ्रँक होता. ट्रस्टमार्फत ३० लाख स्विस फ्रँक ठेवण्यात आले आहेत. २०२० च्या अखेरीस हा आकडा २० लाख स्विस फ्रँक होता.

हे आकडे अधिकृत, काळ्या पैशांचे नव्हेत : स्विस अधिकारी
हे आकडे स्विस बँकांनी एसएनबीला दिले आहेत आणि ते भारतीयांनी स्वित्झर्लंडच्या बँकांत ठेवल्या जाणाऱ्या काळ्या पैशांबाबत कुठलेही संकेत देत नाहीत. या आकड्यांत त्या रकमेचाही समावेश नाही जी भारतीय, प्रवासी भारतीय किंवा इतर तिसऱ्या देशांच्या शाखांद्वारे स्विस बँकांत ठेवू शकतात. स्विस अधिकाऱ्यांनी सातत्याने म्हटले आहे की, भारतीयांची स्वित्झर्लंडमध्ये जमा रक्कम म्हणजे काळा पैसा मानला जाऊ शकत नाही

बातम्या आणखी आहेत...