आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेव्हीने दाखवली तयारी:अँटी शिप मिसाइलने टारगेट उडवण्याचा व्हिडिओ जारी, अरबी समुद्रातील जुन्या जहाजाला बनवले लक्ष्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मिसाइल नौसेनेची फ्रंटलाइन युद्धनौका आयएनएस प्रबलमधून सोडण्यात आली

भारतीय नौदलाने युद्धाची तयारी दाखवण्यासाठी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, युद्ध नौकेतून सोडलेल्या अँटी शिप मिसाइलने एका जहाजावर अचुक वार केला. ही ड्रील अरबी समुद्रात करण्यात आली.

नौदलाच्या आयएनएस प्रबल या युद्ध नौकेतून अँटी शिप मिसाइल डागण्यात आले. आयएनएस प्रबल नौसेनेच्या युद्ध अभ्यासातील जहाज आहे. या अभ्यासात एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्यसोबत अनेक युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि विमानं भाग घेत आहेत. नौसेनेच्या प्रवक्त्याने ट्वीट करुन सांगितले की, आयएनएस प्रबलमधून लॉन्च झालेल्या मिसाइलने आपल्या मॅक्सिमम रेंजने एका जुन्या जहाजाली टार्गेट केले.

नेव्ही चीफने केले नौसेनेचे कौतुक

नेव्ही चीफ एडमिरल करमबीर सिंग यांनी गुरुवारी समुद्रासोबत दुसऱ्या ठिकाणी नौसेनेच्या तयारीचा आढावा घेतला. यासोबतच भारताच्या एकमेव विमान वाहक आयएनएस विक्रमादित्यवरुन नौसैनिकांच्या निवडक ग्रुपला संबोधित केले. नेवी चीफ यांनी मागच्या काही महिन्यांपासून युद्धासाठी नौसेनेच्या तयारींचे कौतुक केले.

चीनच्या वादानंतर तैनाती वाढली

चीनसोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय नौसेनेने हिंद महासागर क्षेत्रात आपली तैनाती वाढवली आहे. याद्वारे चीनला कठोर संदेश देण्याचा प्रयत्न आहे. सध्याची तयारी पाहून नेव्ही चीफ म्हणाले की, येणाऱ्या काळातही हा अभ्यास सुरुच राहील.

नेव्हीत सामील झाली आयएनएस कवरत्ती

भारतात तयार झालेली आयएनएस कवरत्ती गुरुवारी नौसेनेत सामील झाली. सेना प्रमुख एमएम नरवणे यांनी विशाखापटनम नेवल डॉकयार्डमध्ये याला प्रोजेक्ट 28 (कमरोटा क्लास) अंतर्गत कमीशन केले. भारतात तयार झालेली आयएनएस कवरत्ती अँटी-सबमरीन वारफेयर (एएसडब्ल्यू) आणि शत्रुंच्या रडारपासून वाचणाऱ्या स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त आहे.