आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Navy Will Get Six More Submarines, Preparing To Deal With The Challenge From China, Approval Of The Ministry Of Defense

नौसेनेची शक्ती वाढणार:भारतीय नौसेनेला मिळणार सहा पाणबुड्या, संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली मंजुरी

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘प्रोजेक्ट 75 इंडिया’अंतर्गत 43 हजार कोटींचे टेंडर जारी होणार

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौसेनेसाठी सहा पाणबुड्या बनवण्यास मंजुरी दिली आहे. यावर अंदाजे 43,000 कोटींचा खर्च होणार आहे. देशात या पाणबुडी तयार करण्याच्या प्रस्तावाची विनंती (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) लवकर जारी केले जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या 'प्रोजेक्ट-75 इंडिया'अंतर्गत सहा पाणबुड्या तयार करण्यासाठी निविदा जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, मंत्रालयाने अंदाजे 6,800 कोटी रुपयांचे शस्त्र आणि उपकरणांच्या खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. दुसऱ्या एका महत्वाच्या निर्णयात डीएसीने सशस्त्र दलाची तात्काळ खरेदीची मर्यादा 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. हिंदी महासागरात वाढत असलेल्या चीनच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या नौसेनेकडे 15 पाणबुड्या

भारतीय नौसेनेकडे सध्या 15 पाणबुड्या आहेत. यात, दोन परमाणू पाणबुड्या आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र आहेत. आता नौसेनेची 24 नवीन पाणबुड्या मिळवण्याची योजना आहे. हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपानंतर नौसेनेने पाणबुड्या वाढवण्यावर भर दिला आहे.

देशात तयार होतील नवीन पाणबुड्या

नौसेनेसाठी तयार होत असलेल्या या सहा पाणबुड्यांची निर्मिती आत्मनिर्भर भारत अभियानानंतर्गत भारतात होईल. “प्रोजेक्ट-75 इंडिया’अंतर्गत दोन भारतीय कंपन्या एका परदेशी कंपनीच्या मदतीने हे काम करू शकते. प्रोजेक्टसाठी रिक्वेस्ट ऑफ प्रपाेजल (आरएफपी) माझगाव डॉक्स लि (एमडीएल) आणि खासगी कंपनी लार्सन अँड टुब्रोला मिळू शकते. नौसेनेने सांगितल्यानुसार, हा प्रोजक्त पूर्ण होण्यासाठी 12 वर्षे लागतील.

चीनकडे 50+ पाणबुड्या

जागतिक नौसैनिक अभ्यासकांनुसार, चीनी नौसेनेकडे 50 पेक्षा जास्त पाणबुड्या आणि 350 जहाज आहेत. येत्या 8-10 वर्षात जहाज आणि पाणबुड्यांची संख्या 500 च्या पुढे जाईल.

बातम्या आणखी आहेत...