आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Railway Coronavirus Outbreak Latest News Updates; Railway Board Chairperson VK Yadav, Says Not Be Possible To Run All Trains

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय रेल्वेचा निर्णय:12ऑगस्टपर्यंत रेल्वेला रेड सिग्नल, काही स्पेशल ट्रेन्स वाढवण्यावर विचार होऊ शकतो

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय रेल्वेने गुरुवारी 12 ऑगस्टपर्यंत सर्व रेगुलर मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि सब-अर्बन ट्रेन्सला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रेल्वे विभागाने ट्रेन्स न सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने शुक्रवारी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहता, ट्रेन सुरू करणे शक्य नाही. परंतू, काही स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यावर विचार होऊ शकतो.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद यादव म्हणाले की, कोव्हिडची परिस्थिती आणि मागणी पाहता काही विशेष ट्रेन्स वाढवल्या जाऊ शकतात. यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालवरुन मोठ्या शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यावरुन आपली अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसते.

रेल्वेने 12 ऑगस्टपर्यंत ट्रेन्स रद्द केल्या

भारतीय रेल्वेने कोरोनाची परिस्थिती पाहता गुरुवारी मोठा निर्णय घेतला. याअंतर्गत रेगुलर मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि सब-अर्बन ट्रेन्सला 12 ऑगस्टपर्यंत रद्द केले आहे. या ट्रेन्सचे तिकीट बुक करता येणार नाही.

तिकीट रद्द झाल्यावर मिळेल 100 टक्के रिफंड

या ट्रेनमध्ये 1 जुलैपासून 12 ऑगस्टदरम्यान प्रवास करण्यासाठी कोणी तिकीट बुक केले असल्यास, ते रद्द मानले जाईल. परंतू, रेल्वेने स्पष्ट केले आहे की, या तिकीटाचे 100 टक्के रिफंट दिले जाईल. रेल्वेने यापूर्वी 30 जूनपर्यंत रेगुलर ट्रेन सेवा कँसल करण्याचा निर्णय घेतला होता, पण आता याला 12 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले आहे.

गरज पडल्यास अजून ट्रेन वाढवल्या जातील

रेल्वेने सांगितले की, 230 मेल आणि स्पेशल एक्सप्रेस ट्रेन्स सुरू आहेत. यात 12 मे पासून राजधानी रुटवर चालत असलेल्या अशा 24 आणि 1 जूनपासून चालणाऱ्या 200 ट्रेन्स सामील आहेत. रेल्वे यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, गरज पडल्यास स्पेशल ट्रेन वाढवल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...