आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Indian Railways Canceled Tender For Manufacturing Of 44 Nos Of Semi High Speed Vande Bharat Train Sets

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवर अजून एक स्ट्राइक:रेल्वेने रद्द केले 44 सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन बनवण्याचे टेंडर, यामध्ये चीनी कंपनीचाही होता समावेश

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • एका आठवड्यात जारी केले जाईल नवीन टेंडर, मेक इंडियाला दिले जाईल प्राधान्य
 • सीमा वादानंतर चीनी कंपन्यांवर केंद्र सरकारकडून सातत्याने बंदी घालण्यात येत आहे

लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमा वादानंतर भारतातील चिनी कंपन्यांविरूद्ध कारवाई सुरू आहे. आता भारतीय रेल्वेने 44 सेमी हाय-स्पीड वंदे भारत गाड्या बनवण्याची निविदा रद्द केली आहे. असे बोलले जात आहे की, या ट्रेन बनवण्यासाठी भारतीय कंपन्यांसह एका चीनी कंपनीच्या संयुक्त उपक्रमाकडून बोली लावल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला. रेल्वेने ट्विट करत शुक्रवारी रात्री उशीरा टेंडर रद्द करण्याची माहिती दिली.

लवकरच जारी होणार नवे टेंडर
रेल्वेनुसार या ट्रेनच्या निर्मितीसाठी एका आठवड्यातच नवीन टेंडर जारी केले जाईल. या नव्या टेंडरमध्ये मेक इन इंडियाला प्राधान्य दिले जाईल. रेल्वेने सध्या टेंडर रद्द करण्याचे अधिकृत कारण सांगितलेले नाही. या ट्रेनच्या निर्मितीसाठी टेंडर गेल्या महिन्यात प्रस्तुत करण्यात आले होते. चेन्नईच्या रेल्वे कोच फॅक्ट्रीने 10 जुलैला 44 हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी टेंडर जारी करण्यात आले होते.

6 मधील केवळ 1 चीनी कंपनीचा होता समावेश
वृत्तानुसार, 6 कंपन्यांनी 16 कोच असणारी 44 वंदे भारत सेमी हाय-स्पीड गाड्यांसाठी विद्युत उपकरणे व इतर वस्तूंच्या पुरवठ्यासाठी निविदा सादर केल्या होत्या. यामध्ये चीनची संयुक्त उद्यम सीआरआरसी-पायनियर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव परदेशी कंपनी होती, परंतु चीनशी संबंध असल्यामुळे निविदा रद्द करण्यात आली. चीनची कंपनी सीआरआरसी योंगजी इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड आणि गुडगावची पायोनियर इलेक्ट्रिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने 2015 मध्ये हे जॉइंट वेंचर बनवले होते.

1500 कोटी रुपयांचा आहे पूर्ण प्रकल्प
पीटीआयच्या सूत्रांनुसार, रेल्वे मानते की, हे टेंडर एखाद्या भारतीय कंपनीला देण्यात यावे. टेंडरच्या स्पर्धेत चीनी कंपनी सर्वात पुढे दिसली. तेव्हा हे रेल्वे टेंडर रद्द करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत सुमारे 1500 कोटी आहे. सूत्रांनुसार हे टेंडर जारी झाल्यानंतर पब्लिक प्रिक्योरमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. नव्या टेंडरमध्ये या नियमांचाही समावेश करण्यात येईल.

या कंपन्यांनी लावली होती बोली

 • भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
 • भारत इंडस्ट्रीज
 • इलेक्ट्रोवेव्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड
 • मेधा सर्वो ड्राइव्स प्रायव्हेट लिमिटेड
 • पावरनेटिक्स इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

दिल्ली-वाराणसीच्या दरम्यान चालवण्यात आली होती पहिली वंदे भारत ट्रेन
देशात दोन रुटवर सेमी हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे संचालन होते. फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली-वाराणसी रुटवर देशातील पहिली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. यानंतर दुसऱ्यांदा वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली आणि कटरासाठी चालवण्यात आली. या ट्रेनला गृहमंत्री अमित शाह यांनी 3 अक्टोबर 2019 ला हिरवा झेंडा दाखवला होता.