आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Special Forces Member Killed In China Border Skirmish In Ladakh; Claim In Media Reports

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमावाद:चीनसोबत झालेल्या झडपेत भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सचा एक जवान शहीद, तर एक जखमी; मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीडिया रिपोर्टनुसार जवान हा मूळचा तिबेट होता आणि स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये तैनात होता

लडाखमधील दक्षिण पांगोंगच्या वादग्रस्त भागात चीनशी झालेल्या झडपेत भारताचा एक जवान शहीद तर एक जखमी झाल्याचा दावा परदेशी मीडियाने केला आहे. वृत्तानुसार जवान हा मूळचा तिबेटी असून त्याला स्पेशल फ्रंटियर फोर्स (एसएफएफ) येथे तैनात होता. मात्र याप्रकरणी सैन्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दुसरीकडे चीनने देखील कोणतीही माहिती दिली नाही.

29-30 ऑगस्टच्या रात्री चीनच्या सुमारे 500 सैनिकांनी एका टेकडीत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैनिकांनी हा डाव हाणून पाडला. याआधी 5 जून रोजी लडाखच्या गलवानमध्ये भारत आणि चिनी सैन्यात हिंसक झडप झाली होती. यामध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना काटेदार तारांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे देखील 35 सैनिक मारले गेले होते, मात्र चीनचे अद्याप पर्यंत याची पुष्टी केली नाही.

निर्वासित तिबेटी संसदेच्या सदस्याने केला हा दावा

तिबेटी संसदेचे निर्वासित सदस्य नामग्याल डोळकर लघियारी यांनी मंगळवारी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, शनिवारी रात्री झालेल्या संघर्षात तिबेटी वंशाचा एक सैनिक शहीद झाला. तसेच एक जवान जखमी झाल्याचेही ते म्हणाले.

चीनने 3 दिवसांत 3 वेळा उचकवण्याचा प्रयत्न केला

29-30 ऑगस्टच्या रात्रीनंतर 31 ऑगस्ट रोजी देखील लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर उचकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 1 सप्टेंबर रोजी पुन्हा बातमी आली की चुनार भागात चिनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांना पुन्हा पिटाळून लावले.

20 ऑगस्टपासून चीनच्या कटाची लष्कराला माहिती होती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याला गेल्या महिन्यातच इंटेलिजन्स इनपुट मिळाले की चीनच्या सैन्याने पांगोंग तलावाच्या दक्षिणेस नवीन मोर्चा उघडण्याची तयारी करत आहे. याच आधारावर भारतीय सेनेने एक आठवड्यात तयारी केली आणि दक्षिणेकडे एसएसीला लागून असलेल्या ठिकाणांवर जवानांची तैनाती केली. आणि भारतीय सेनेचा हा अंदाज अचून ठरला. 29-30 ऑगस्टच्या रात्री जेव्हा चीनचे 500 सैनिक घुसखोरी करण्यासाठी पोहोचले तेव्हा भारतीय जवानांना पाहून ते हैराण झाले.