आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Troops Deploy T 90 And T 72 Tanks On LAC, Capable Of Hitting Enemy At Minus 40 Degree Temperature

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनविरुद्ध लडाखमध्ये तयारी:भारतीय सैन्याने एलएसीवर तैनात केले टी-90 आणि टी-72 टँक, मायनस 40 डिग्री टेम्परेचरमध्ये शत्रुवर मारा करण्यास सक्षम

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 हजार 500 फूट ऊंचींवर चुमार-डेमचोक परिसरात टँक तैनात केले
  • या परिसरात हिवाळ्यात रात्रीचे तापमान मायनस 35 डिग्रीपर्यंत कमी होते

लडाखमध्ये 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत थंडीच्या मोसमातही मोर्चा हाताळण्याची भारतीय सैन्याने तयारी सुरू केली आहे. सैन्याने पूर्व लडाखमध्ये लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) जवळ आर्मर्ड रेजीमेंटचे टी-90 आणि टी-72 टँक तैनात केले आहेत. याशिवाय बीएमपी-2 कॉम्बॅट व्हीकलदेखील पाठवण्यात आले आहेत. हे य युद्ध टँक 14 हजार 500 फुटांच्या उंचीवर चुमार-डेमचोक एरियात तैनात असतील. टँकसाठी हा सर्वात उंच भाग आहे.

या टँकचे वैशिष्ट्य म्हणजे मायनस 40 अंश तापमानात देखील ऑपरेट केले जाऊ शकतात. 14 कॉर्प्सच्या चीफ ऑफ स्टाफने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, लडाखमध्ये हिवाळ्यात परिस्थिती खूप खराब असते. पण आम्ही या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार आहोत. हाय कॅलरी आणि न्यूट्रीशनचे राशन आमच्याजवळ आहे. फ्यूल आणि ऑइल, हिवाळ्याचे कपडे, गरमी करण्यासाठीचे उपकरणदेखील आम्ही जमा करुन ठेवले आहेत.

ऊंची आणि हिवाळ्यात टँकांच्या मेंटेनेंसचे मोठे आव्हान

मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले की, हिवाळ्यात या परिसरात रात्रीचे तापमान मायनस 35 डिग्रीपर्यंत खाली उतरते. याशिवाय वेगाने थंड वारेही वाहतात. या परिसरात टँक, युद्ध उपकरणे यांच्या मेंटेनन्सचे मोठे आव्हान असते. फायर अँड फ्यूरी कॉर्प्स भारतीय सैन्याची एकमेव किंवा जगातील एकमेव तुकडी आहे, जी अशा परिस्थितीत मोर्चा सांभाळण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

आर्मर्ड रेजीमेंटला कोणत्याही परिस्थितीत युद्ध करण्याचा अनुभव

टँकवर तैनात एका जवानाने सांगितले की, मॅकेनाइज्ड इन्फॅन्ट्री सैन्याचा अॅडवांस भाग आहे. येथे कोणतेही वातावरण आणि परिस्थितीत युद्ध करण्याची तयारी आहे. मिसाइल स्टोरेज आणि हाय मोबिलिटी एम्यूनिशनसारख्या वैशिष्ट्यामुळे अनेक काळ युद्ध करण्याची तयारी आहे. इन्फॅन्ट्रीमध्ये तैनात जवानांना कोणतेही हत्यार चालवण्यासाठी ट्रेन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...