आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Villeges Updates: There Are Banks And Temples In This Village Of Delhi, Not A Hospital; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:दिल्लीच्या या गावांत बँका- मंदिरे आहेत, रुग्णालय नाही; केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दत्तक घेतलेल्या 3 गावांची व्यथा...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीच्या सिंघोला, घोगा आणि धीरपूर गावातून प्रमोदकुमार यांचा ग्राउंड रिपोर्ट
  • फक्त दत्तक घ्यायला मंत्री आले, त्यानंतर ढुंकूनही पाहिले नाही

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत गावांमध्ये तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दिल्लीतील काही गावे अशीही आहेत, जेथे प्राथमिक आरोग्य सुविधादेखील नाहीत. खो-खोचे खेळाडू व १५ वेळा राष्ट्रीय विजेते सिंघोला गावाचे सुशील गौड सांगतात, प्राथमिक उपचार न मिळाल्याने माझ्या ६५ वर्षांच्या वडिलांचा जीव वाचू शकला नाही. साडेतीन हजार लोकवस्तीच्या या गावात अशी अनेक उदाहरणे आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी २०१८ मध्ये दत्तक घेतलेल्या ३ गावांपैकी सिंघाेला एक आहे. ज्या दिवशी गाव दत्तक घेतले त्याच दिवशी त्यांना शेवटचे पाहिले, असे ग्रामस्थ सांगतात. देशाच्या राजधानीत अशी अनेक गावे आहेत, जेथे बँक-मोठी मंदिरे आहेत, मात्र रुग्णालय नाही.

डॉ. हर्षवर्धन यांनी दत्तक घेतलेल्या दिल्लीच्या गावांची स्थिती महामारीदरम्यान भास्करने जाणून घेतली. त्यांनी २०१८ मध्ये सिंघोला व त्याआधी २०१४ मध्ये धीरपूर आणि घोगा गावांना दत्तक घेतले होते. गावकऱ्यांनी सांगितले की, कोरोना काळात सिंघोलामध्ये सुमारे ९० टक्के लोकांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसली. त्यातील बहुतांशी घरीच बरे झाले. काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले तर काही वाचू शकले नाहीत. तरीही गावात तपासणी झाली नाही, बघायलाही कोणी आले नाही. सिंघोलातील देवेंद्रने सांगितले, जवळच्या बकौली गावाचे शरद चौहान “आप’चे आमदार आहेत. हरिचंद्र सांगतात, झोपडपट्टीतील आपला मते देतात.

आप सरकारने झोपडपट्टी हटवून टिकरी गावात लोकांचे पुनर्वसन केले आणि मोहल्ला क्लिनिक सुरू केले. आमच्या गावात बँक, एटीएम, मोठी मंदिरे आणि रस्ता आहे, फक्त उपचार भेटत नाहीत. सिंघोलात घुसताच नाला दिसतो. राजेश खत्री सांगतात, दुर्गंधीमुळे पूर्ण गाव आजारी पडते. घरोघरी मलेरियाच्या तक्रारी आहेत. ताप-खोकल्याच्या औषधांसाठीही ५ किमी जावे लागते. सिंघोलातील देवेंद्र, घोगातील ९५ वर्षांचे किशनसिंह, ८० वर्षांचे जयभगवान सांगतात, मंत्रिमहोदयांनी एके दिवशी मोठेपणात गाव दत्तक घेतले. नंतर ढुंकूनही पाहिले नाही.

रुग्णालय झाले नाही, मात्र स्मशानभूमी झाली
२५ हजार लोकसंख्येच्या धीरपूरमध्ये इतर सुविधा आहेत, मात्र रुग्णालय नाही. आपातस्थितीत १० किमी लांब हिंदुराव रुग्णालयात जावे लागते. लोक निरंकारी दवाखान्यावर अवलंबून आहेत. गावातील वसंतराम थट्टेत सांगतात, डॉ. हर्षवर्धन गावात रुग्णालय बांधू शकले नाहीत, पण स्मशानभूमी झाली आहे. ताप-खोकल्याच्या औषधांसाठीही ५ किमी जावे लागते. सिंघोलातील देवेंद्र, घोगातील ९५ वर्षांचे किशनसिंह, ८० वर्षांचे जयभगवान सांगतात, मंत्रिमहोदयांनी एके दिवशी मोठेपणात गाव दत्तक घेतले. नंतर ढुंकूनही पाहिले नाही.

आम्ही राजधानीत, मात्र तापाची गोळीही नाही
घोगातील जयभगवान म्हणाले, येथे होमिओपॅथी दवाखाना होता, मात्र इमारत जीर्ण झाल्याने सिनोटला गेला. आम्ही राजधानीत आहोत, मात्र तापाचे औषध नाही. रमेशचंद्र तिरोडीवाल सांगतात, गावात औषध नाही, शहरात बेड नाही... कोठे जायचे? ६ किमी लांब पुंठला गेल्यावर दुसरीकडे पाठवतात.

समाजमंदिराच्या जागेवर केली जाते गुरांची सोय
सिंघोलातील मंुशीराम यांनी सांगितले, आम्हाला मोहल्ला क्लिनिक मिळाले तर बरे होईल. वीरेंद्र म्हणाले, गावात पशुवैद्यकीय दवाखाना झाला, मात्र डॉक्टर नसल्याने बंद आहे. जर त्याच इमारतीत दवाखाना सुरू केला तर आम्हाला प्राथमिक उपचार मिळतील. सुशील गौड यांनी ज्या जागेवर समाजमंदिर होणार होते तेथे लोक गुरे बांधत असल्याचे दाखवले.

बातम्या आणखी आहेत...