आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय नाैदलाचे माेठे पाऊल:चीनच्या विराेधानंतरही भारताची युद्धनौका दक्षिण क्षेत्रात तैनात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गलवान खाेऱ्यात झाली होती चिनी सैनिकांसाेबत धुमश्चक्री

गलवान खाेऱ्यात चिनी सैनिकांसाेबत झालेल्या धुमश्चक्रीनंतर भारतीय नाैदलाने माेठे पाऊल उचलले असून दक्षिण चीन सागरात युद्धनाैका तैनात केली आहे. उभय देशांतील चर्चेदरम्यान या पावलावर चीनने आक्षेप दर्शवला हाेता. या सागरी क्षेत्रात भारतीय नाैदल जहाजांच्या तैनातीवर चीनने सातत्याने आक्षेप घेतला आहे.

चीनने २००९ पासून सैनिक व कृत्रिम बेटांचा वापर करून माेठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नाैदलाने काेणत्याही इतर दलाच्या उपस्थितीवर आक्षेप घेतलेल्या सागरी क्षेत्रात भारताने युद्धनाैका तैनात केली. ही युद्धनाैका तैनात करतानाच अंदमान-निकाेबारजवळ मलक्का जलडमरूमध्येदेखील नाैदलाने सुरक्षा वाढवली. त्याद्वारे चिनी नाैदलाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवता येणार आहे. या ठिकाणाहून चिनी जहाजे हिंदी महासागर क्षेत्रात प्रवेश करतात. दक्षिण चीन सागरात अमेरिकेची युद्धनाैका आधीपासूनच तैनात आहे. भारतीय युद्धनाैका सुरक्षित माहितीसाठी अमेरिकेच्या संपर्कात आहे.

चिनी नाैदलाचा सराव सुरू
बीजिंग । दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या उपस्थितीमुळे तणाव वाढत चालला असून चीनने येथे नाैदलाच्या सरावात वाढ केली आहे. चीनने पूर्व सीमेवर दाेन ठिकाणी हल्ले आणि बचाव रणनीतीवरून सराव सुरू केला आहे. तैवानला बळाचा वापर करून चीनमध्ये समाविष्ट करण्यासाठी चीन कुरापती करू लागल्याचे संरक्षण जाणकारांना वाटते.