आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री प्रियंका चोप्राने काही दिवसांपूर्वी तिसाव्या वर्षी बीजांड आणि त्यानंतरच्या स्थितीबाबत मतप्रदर्शन केले होते. यानंतर मातृत्वाची तयारी होईपर्यंत फ्रिजिंगचा नवा ट्रेंड प्रकाशझोतात आला आहे. अनुवंशिक दोष टाळण्यासाठी तिशीतील भारतीय महिला १० वर्षांपर्यंत आपले बीजांड गोठवत आहेत.
यानंतर ते नष्ट केले जाते किंवा मेडिकल सेंटरला संशोधनासाठी दान केले जातात. चेन्नईत जीजी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रिया सेल्वराज यांनी सांगितले की, १९८० च्या दशकात बीजांडातून पहिला जिवित जन्म १९८६ मध्ये झाल होता. ज्या महिला उशिरा आई हाेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान आशादायक आहे. या एग फ्रिजिंगच्या सुरुवातीच्या प्रक्रियेसाठी भारतात सुमारे १.५ लाख ते ३ लाखापर्यंत खर्च येतो. फ्रिजिंगसाठी वार्षिक १०,००० ते ७५,००० रु.शुल्क लागते. मात्र, आता महिला जागरूक होत असून त्या मर्यादीत संख्येत बीजांड(१० ते २० लाख) निर्माण करू शकतात. नवी दिल्लीत इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात एआरटी विभागाच्या वरिष्ठ सल्लागार रूपाली गोयल म्हणाल्या, पस्तीशीनंतर बीजांडाची गुणवत्ता बिघडते आणि अनुवंशिक दोषांचा धोका वाढतो. स्त्रीरोग तज्ज्ञ मीनाक्षी आहुजा यांच्यानुसार, महिला ४६.२ वर्षाच्या सरासरी वयात रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे भारतीय महिला तिशीत असा विचार करतात.
ओओसीट क्रायोप्रिझर्व्हेशनच्या रूपात आेळखले जाते. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात महिलेचे स्त्री बीजांड संरक्षित करण्यात मदत करते. यामुळे त्यांना निवडलेल्या तारखेत आई होण्यासाठी सक्षम बनवले जाऊ शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.