आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Wrestler Murder Accused Sushil Kumar Demands TV Set For Wrestling Updates In Tihar Jail

जेलमध्ये सुशीलची नवीन मागणी:हत्येचा आरोपी ऑलिम्पिक मेडलिस्टने पहिले हाय प्रोटीन आहार मागितला, आता  तुरुंगात टीव्ही बसवण्यासाठी लिहिले पत्र

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पैलवान सागरच्या हत्येचा आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार तिहार तुरुंगात बंद आहे. येथे त्याच्या मागण्या सतत वाढत आहेत. यापूर्वी कुस्तीपटू सुशीलने हाय प्रोटीन आहार मागितला होता. आता त्याने तुरूंगात टीव्ही बसवण्यासाठी पत्र लिहिले आहे. रविवारी जेल प्रशासनाने याची पुष्टी केली. दिल्ली कोर्टाच्या आदेशानुसार 9 जुलैपर्यंत सुशील न्यायालयीन कोठडीत राहील.

तिहार कारागृह अधिकाऱ्याने सांगितले की, कुस्तीपटू सुशील कुमारने तुरूंग प्राधिकरणाला टीव्ही सेटची मागणी केली आहे. टीव्ही बसवून तो कुस्ती पाहू शकेल आणि खेळाविषयी अपडेट राहील असा युक्तिवाद सुशीलने केला आहे. परंतु या पत्रावर विचार केला जाईल, असे जेल प्रशासनाचे म्हणणे आहे. सुरक्षा आणि आवश्यकतेच्या दृष्टिकोनातून ही मागणी योग्य वाटत असेल तरच त्याला ती दिली जाऊ शकते.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी सांगितल्यानुसार, ५ मे रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यात गोळीबारदेखील करण्यात आला होता. या हाणामारीत सागर (२३), सोनू (३७), अमित कुमार (२७) आणि इतर 2 पैलवान जखमी झाले होते.

सागरचा उपचारादरम्यान मृत्यू
या हाणामारीत जखमी झालेल्या सागरचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही हाणामारी संपत्तीच्या वादातून झाली होती. सागर आणि त्याचे मित्र ज्या घरात राहत होते, ते घर रिकामे करण्यासाठी सुशील कुमार दबाव टाकत होता.

घटनास्थळावरुन डबल बॅरल गन आणि काडतूस मिळाले
पोलिसांना घटनास्थळावरुन ५ गाड्यांसह एक लोडेड डबल बॅरल गन आणि ३ जिवंत काडतूस सापडले. दरम्यान, या प्रकरणात प्रसिद्ध पैलवान सुशील कुमारवर गंभीर आरोप असल्यामुळे दिल्ली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सुशीलने आरोपांचे खंडन केले
घटनेच्या एका दिवसानंतर सुशील कुमारने आपली बाजू मांडली होती. त्याने म्हटले होते की, हाणामारी झालेल्या पैलवानांची टोळी आमच्या ओळखीची नव्हती. त्यांची हाणामारी सुरू होती, तेव्हा आम्हीच पोलिसांना सूचना दिली होती.

बातम्या आणखी आहेत...