आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात एकापेक्षा जास्त भाषा शिकण्याची क्रेझ कोरोनाकाळात वाढली आहे. जगात सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या ड्योलिंगो या लँग्वेज लर्निंग अॅपवर गेल्या वर्षी संपूर्ण जगभर सर्वाधिक युजर भारतात वाढले आहेत. कंपनीनुसार, आतापर्यंत २०१९ च्या तुलनेत ४०० टक्के युजर्स वाढले आहेत. गेल्या नोव्हेंबरअखेर हे अॅप जगभरात ५० कोटींवर लोकांनी डाऊनलोड केलेे. त्यात भारतीयांची संख्या मोठी आहे. हिंदीतून इंग्रजी शिकत आहेत.
82 लाख पेक्षा जास्त लोक ड्योलिंगो अॅपवर हिंदी भाषेत इंग्रजी शिकत आहेत.
अॅपचा दावा :
आमचा ३४ तासांचा अभ्यास विद्यापीठाच्या एका सेमिस्टरएवढाड्योलिंगोवरील ३४ तासांचा अभ्यास एखाद्या विद्यापीठाच्या भाषा अभ्यासक्रमाच्या एका सेमिस्टरएवढा आहे, असा अॅपचा दावा आहे. एका अभ्यासाच्या हवाल्याने हा दावा केला आहे. जगभरात या अॅपचे युजर आपल्या भाषेत दुसरी भाषा शिकतात. पण भारतात ९५% युजर्सचे मोबाइल आणि अॅप सेटिंग इंग्रजी भाषेतच असते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.