आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indians Lit Lamps And Candles For 9 Minutes To Increase The Courage Of The Corona Warriors, Indians With Prime Minister's Call

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशेचा दिपोत्सव:कोरोना वॉरियर्सचे धैर्य वाढवण्यासाठी देशवासियांनी 9 मिनीटे दिवे आणि मेणबत्त्यांनी परिसर प्रज्वलीत केला, पंतप्रधानांच्या आवाहनाला भारतीयांची साथ

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान म्हणाले होते- 130 कोटी जनतेच्या एकतेनेच आपल्याला कोरोनाशी सामना करण्याची हिम्मत येईल

कोरोना व्हायरसचा अंधार मिटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशतील नागरिकांनी आज(रविवार) रात्री 9 वाजता 9 मिनीटांसाठी घराच्या सर्व लाइट बंद करुन, दिवे, मेणबत्ती, टॉर्च आणि मोबाईलचा फ्लॅश लावून अंधारावर मात केली. पंतप्रधानांनी लोकांना लक्षात राहावे म्हणून, रविवारी एक ट्वीटदेखील केले होते. यापूर्वी मोदींनी कोरोना संकटावर आपल्या तिसऱ्या संबोधनात म्हटले होते की, आपल्याला 5 एप्रिलला आपल्या महाशक्तिला जागे करायचे आहे 

वीज उपकरणांना कोणताच धोका नाही उपकरणों: ऊर्जा मंत्रालय केंद्रीय ऊर्जा सचिव संजीव नंदन सहाय यांनी त्या सर्व शंकांचे खंडन केले होते, ज्यात म्हण्यात आले होते की, लाइट बंद झाल्यानंतर व्होल्टेज वाढल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे खराब होतील. लोकांनी रात्री 9 वाजता फक्त लाइट बंद करावे.  पंखा, फ्रिज, एसीसारखी उपकरणे सुरूच ठेवावीत. या उपकरणांना कोणताच धोका नाही. सर्व वीज उत्पादक आणि बीज विभाग यासाठी तयार आहेत. ग्रिडमध्ये कोणताच फॉल्टल होणार नाही.  मोदींनी केली होती अपील कोरोना संकटावर मोदींनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या संबोधनामध्ये 5 एप्रिलला सर्व लाइट बंद ठेवून दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाइलचा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, "आपल्याला प्रकाशाची शक्ती दाखवायची आहे. रविवारी 130 कोटी देशवासीयांनी महाशक्ती दाखवायला हवी. घराच्या सर्व लाइट बंद करा आणि घराच्या बालकनी, खिडकी, किंवा छतावर येवून दिवे, मेणबत्त्या, टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लॅश लावावा. यामुळे घरात असलेल्या लोकांना एकटे वाटणार नाहीत. यादरम्यान सोशल डिस्टंसींगचे पालनही करावे.''