आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवनिर्मित विध्वंसाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. हा विध्वंस १०० वर्षांचे ठराविक वय पार केलेल्या धरणांमुळे होऊ शकतो. यात तब्बल २३४ धरणांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वाधिक ६३ धरणे मध्य प्रदेशात आहेत. यासंदर्भात संसदेच्या स्थायी समितीकडून अलर्ट मिळाल्यानंतर जलसंपदा मंत्रालयाने सेफ्टी आॅडिट सुरू केले आहे. धरणाच्या सुरक्षेबाबत संपूर्ण तपशील ३ महिन्यांत तयार करण्यास सांगितले आहे.
धरण सुरक्षा प्राधिकरणानुसार, १९१७ पासून ते २००७ पर्यंत पाच मोठी धरणे फुटली आहेत. सर्वात भीषण घटना १९७९ मध्ये घडली होती. तेव्हा गुजरातच्या मोरबीतील मच्छू धरण फुटले होते. धरण फुटल्याच्या घटनांत २००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील तिघरा धरण याबाबतीत बदनाम आहे. याची निर्मिती १९१७ मध्ये झाली आणि त्याच वर्षी ते फुटले. कालबाह्य झालेली ही धरणे हटवून नद्यांचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. यावर संसदीय समितीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. कालबाह्य धरणे बंद करण्याची व्यवस्था करा, असे समितीने सरकारला सांगितले आहे. {तयारी ः धरणांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर केंद्राने २ वर्षांपूर्वी धरण सुरक्षा कायदा पारित केला होता. राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणही स्थापन केले. तथापि, यासाठी केवळ १२ कोटी रुपये निधी देण्यात आला.
२०० ते १३०० वर्षे जुनी १४ धरणे
राज्य धरण वय (वर्षांत)
कर्नाटक थोण्णुर टँक १३००
आंध्र प्रदेश कुंभम ५२३
राजस्थान स्वरूप सागर ४६३
राजस्थान उदयसागर ४३८
महाराष्ट्र धामपूर (सिंधूदूर्ग) ४३३
राजस्थान राजसमंद ३४७
यूपी बरुआ सागर ३२९
यूपी मगर पूर ३२९
यूपी पचवाडा लेक ३२९
राजस्थान जयसमंद २९३
ओडिशा जगन्नाथ सागर २४२
महाराष्ट्र कलपविहीर (बुलडाणा) २२३
महाराष्ट्र मुडाणा (यवतमाळ) २२३
महाराष्ट्र भुशी (पुणे) २२३
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.