आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी झेप:विदेशींना आकर्षित करताहेत भारताचे समुद्रकिनारे, अनलॉकनंतर केरळला येत आहेत सर्फर्स; जाँटी ऱ्होड्स येथे उघडणार अकॅडमी

तिरुवनंतपुरम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ, कर्नाटक आणि पुद्दुचेरीचे किनारे देशात-जगात सर्फिंग हब म्हणून विकसित होत आहेत

देशाची ओळख आता सर्फिंग हब म्हणूनही होत आहे. सध्या केरळच्या वर्कला आणि कोवलम किनाऱ्यावर ३०-४० विदेशी खेळाडू समुद्राच्या उंच लाटांवर कलाबाजी करताना दिसत आहेत. माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स येथे विशेषत्वाने सर्फिंगसाठी येतो. तो कोवलमवर लवकरच अकॅडमी सुरू करणार आहे. कोवलम सर्फ क्लब स्थानिक मुलांना नि:शुल्क सर्फिंग शिकवते. क्लबचे संस्थापक पोर्तुगीज सर्फर जेली रिगोले म्हणाले, ‘ मी १० वर्षांपूर्वी कोवलमला आलो होतो. वर्कला व कोवलम किनाऱ्यादरम्यान उंच लाटा पाहिल्यानंतर मी येथे सर्फिंगच्या सुविधांची माहिती घेतली. पण येथे मला क्लब किंवा सर्फर आढळला नाही. मी मित्रांकडून सर्फबोर्ड जमा केले आणि मुलांना प्रशिक्षण देणे सुरू केले. मी घरोघरी जाऊन लोकांना आपल्या मुलांना पाठवण्याची विनंती करत होतो. पण मुले बुडतील या भीतीने लोक नकार देत होते. पण आता चित्र बदलले आहे याचा मला आनंद आहे. पुद्दुचेरीचे किनारे, कर्नाटकमध्ये मंगलोरचा मुल्की किनारा, केरळचे कोवलम आणि वर्कला किनारा आता भारताचे सर्फिंग हब झाले आहेत. सर्फिंगला प्रोत्साहन म्हणून सरकारही सहकार्य करत आहे. आगामी काही वर्षांत भारतात सर्फिंगची आवड निर्माण होणाऱ्यांत वेगाने वाढ होईल, असा मला विश्वास आहे.’

वर्कला किनाऱ्यावरील सर्फिंगचे प्रशिक्षक बी. राहुल म्हणाले, ‘देशात सर्फिंगचे आकर्षण वाढण्याची अनेक कारणे आहेत. येथील पाण्यात शार्क मासे नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यांप्रमाणे जास्त उष्णताही नाही. बाली, श्रीलंका, इंडोनेशिया आणि पोर्तुगालच्या तुलनेत येथे सर्फिंग करणे खूप स्वस्त आहे.’ इंग्लंडचे सर्फर जेमी मिशेल म्हणाले,‘वर्कला किनारा आतापर्यंत अस्पर्श होता. येथे सर्फरला पुरेशी जागा मिळते. गर्दी असलेल्या किनाऱ्यावर ते शक्य नसते. १.५ मीटर उंच लाटा उसळतात, त्या सर्फिंग शिकण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. येथे सप्टेंबर ते मे हा हंगाम सर्वात चांगला आहे. ’ केरळच्या पर्यटन सचिव राणी जॉर्ज म्हणाल्या की, आम्ही सर्फिंगसाठी कन्नूर किनाराही िवकसित करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...