आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India's Biggest Bomb Vs Pakistan; All About MP Jabalpur Ordnance Factory Khamaria (General Purpose Bomb)

भारताचा सर्वात मोठा बॉम्ब तयार:500 किलो वजन, क्षणार्धात बेचिराख करू शकतो पाकचे कोणतेही विमानतळ- बंकर, हवाई दलाला मिळाली 48 बॉम्बची पहिली खेप

जबलपूर4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

देशाची ताकद वाढवण्यासाठी म्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स फॅक्टरी खमारियाने 500 किलोचा जीपी बॉम्ब (जनरल पर्पझ बॉम्ब) बनवला आहे. हा बॉम्ब एवढा विनाशकारी आहेत की आकाशातून डागल्यानंतर तो सर्वात मोठे बंकरदेखील नष्ट करू शकतो. एका बॉम्बने पाकिस्तानातील कोणतेही विमानतळ क्षणार्धात ध्वस्त केले शकते. या बॉम्बची मारक शक्ती आणि सामर्थ्य देशाच्या सुरक्षा ताफ्याला आणखी मजबूत करेल. ओएफकेला पोहोचलेले हवाई दलाचे पथक शुक्रवारी हे 48 बॉम्ब घेऊन डेपोकडे रवाना झाले.

ऑर्डनन्स फॅक्टरी खमरियासाठी हे विशेष आहे की, या बॉम्बची संपूर्ण रचना आणि निर्मिती कारखान्यातच झाली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक एसके सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 500 किलो जीपी बॉम्बचे उत्पादन हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.

जीपी बॉम्ब शुक्रवारी हवाई दलाकडे पाठवण्यात आले.
जीपी बॉम्ब शुक्रवारी हवाई दलाकडे पाठवण्यात आले.

देशातील सर्वात मोठा बॉम्ब

कारखान्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भारतातील सर्वात मोठा बॉम्ब आहे. त्याची लांबी 1.9 मीटर आणि वजन 500 किलो आहे. हा बॉम्ब जग्वार आणि सुखोई SU-30 MKI वरून टाकला जाऊ शकतो. हा बॉम्ब जबलपूर येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या एफ-6 विभागात तयार करण्यात आला आहे.

जीपी बॉम्बबद्दल जाणून घ्या

जीपी बॉम्ब हा सामान्य हेतूचा बॉम्ब आहे. तो बॉम्बर विमानात अपलोड केला जातो. स्फोट करणे, नुकसान पोहोचवणे आणि स्फोटक शक्तीने विखंडन करणे हा याचा उद्देश आहे. याची डिझाइन ही शत्रू सैनिक, वाहने आणि इमारतींच्या विरोधात प्रभावीपणे करण्यात आली आहे. सामान्य-उद्देश (GP) बॉम्बर्स सामान्यत: TNT, कंपोझिशन B किंवा ट्रायटोनलसह जाड-भिंतीच्या धातूचे आवरण वापरतात, जे बॉम्बच्या एकूण वजनाच्या 30% ते 40% इतके असतात.

500 किलो वजनाचा जीपी बॉम्ब हा देशातील सर्वात मोठा बॉम्ब आहे.
500 किलो वजनाचा जीपी बॉम्ब हा देशातील सर्वात मोठा बॉम्ब आहे.

48 बॉम्बची पहिली खेप रवाना

महाव्यवस्थापकांनी पहिल्या खेपेच्या 48 बॉम्बना हिरवा झेंडा दाखवला. आयुध निर्माणी खमरियाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. बॉम्ब निर्मितीत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. यावेळी DGAQA कमांडिंग ऑफिसर आर.आर.पंत, अतिरिक्त महाव्यवस्थापक अशोक कुमार, शैलेश वगरवाल, विकास पुरवार, सहमहाव्यवस्थापक वाय.के.सिंग, उपमहाव्यवस्थापक दिनेश कुमार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

 • या जीपी बॉम्बच्या एका वापराने संपूर्ण विमानतळ उडवले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 • त्याच्या वापराने रेल्वे रुळ आणि मोठे पूलही तुटू शकतात.
 • या बॉम्बमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे बंकरमध्येही स्फोट होऊ शकतो.

10,300 स्टील बुलेट बॉम्ब

 • एका बॉम्बमध्ये 15 मि.मी.चे 10,300 गोळे स्टीलचे असतील.
 • स्फोटानंतर, प्रत्येक गोळा 50 मीटरपर्यंत लक्ष्य भेदेल. एक गोळा 12 मिमी स्टीलच्या प्लेटला भेदून आरपार जाऊ शकतो.
 • 500 किलो वजनाच्या बॉम्बची लांबी 1.9 मीटर आहे.
 • हे जग्वार आणि सुखोई-३० वर अपलोड केले जाऊ शकते.

डीआरडीओने विकसित केले तंत्रज्ञान

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने हा बॉम्ब अनेक भागांमध्ये विकसित केला आहे. प्रत्येक बॉम्बमध्ये 15-मिमीचे 10,300 स्टीलचे गोळे बसवले आहेत. स्फोटानंतर, प्रत्येक शेल 50 मीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करेल. विशेष बाब म्हणजे स्टीलचे गोळे 12 मिमीच्या स्टील प्लेटमध्येही प्रवेश करू शकतात. यामुळे भारताची सामरिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल. सामरिक दृष्टिकोनातून जीपी बॉम्ब भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जीपी बॉम्बमुळे भारतीय लष्कराला विजय तर मिळेलच, पण तो भारतीय लष्कराला सुरक्षा क्षमताही प्रदान करेल.

बातम्या आणखी आहेत...