आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सर्वात मोठा कार चोर:27 वर्षांत चोरल्या तब्बल 5000 कार, टॅक्सी चालकांचे केले मर्डर; 3 बायका व 7 मुलांचे कुटुंब

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कार चोर अनिल चौहानच्या अटकेनंतरचे हे छायाचित्र. त्यात अनिल जमिनीवर बसल्याचे दिसून येत आहे.  - Divya Marathi
कार चोर अनिल चौहानच्या अटकेनंतरचे हे छायाचित्र. त्यात अनिल जमिनीवर बसल्याचे दिसून येत आहे. 

दिल्ली पोलिसांनी सोमवारी अनिल चौहान नामक देशातील सर्वात मोठ्या कार चोराला बेड्या ठोकल्या. अनिल चौहानवर तब्बल 5000 कार्स चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 52 वर्षीय अनिलने चोरीच्या पैशांतून दिल्ली, मुंबई व ईशान्य भारतात अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तो श्रीमंतीचे आयुष्य जगत होता. त्याला 3 बायका व 7 मुले आहेत.

पोलिसांनी हा देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याचा आरोप केला आहे. त्याने 27 वर्षांत 5 हजारांहून अधिक कार चोरल्या. सेंट्रल दिल्ली पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांना अनिलच्या कारवायांची खबर मिळाली होती. त्यानंतर त्याच्या देशबंधू गुप्ता मार्गावरून मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 6 पिस्तूल व 7 काडतुसे जप्त केली आहेत.

कार चोरीसाठी केले टॅक्सी चालकांचे खून

दिल्लीच्या खानपूर भागात राहणारा कधीकाळी अनिल ऑटोरिक्षा चालवण्याचे काम करत होता. 1995 नंतर त्याने कार चोरण्यास सुरूवात केली. 27 वर्षांत त्याने सर्वाधिक मारूती 800 मॉडल चोरले. तो देशाच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन कार चोरी करत व त्या नेपाळ, जम्मू काश्मीर व ईशान्येतील राज्यांत विक्री करत. चोरी करताना त्याने अनेक टॅक्सी चालकांचेही खून केले.

त्यानंतर त्याने आसाममध्ये राहण्यास सुरूवात केली. कार चोरीतून मिळालेल्या पैशांतून त्याने दिल्ली, मुंबई व ईशान्य भारतातील राज्यांत मालमत्ता खरेदी केली. त्याने आसाममधील सरकारी कंत्राटदार म्हणूनही काम केले. तो तेथील स्थानिक नेत्यांच्या संपर्कातही होता.

मनी लाँड्रिंग व शस्त्रांच्या तस्करीत समावेश

पोलिसांच्या माहितीनुसार, अनिलचा शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही हात आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेशातून शस्त्र घेऊन ईशान्येतील प्रतिबंधित सघटनांना पुरवल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरोधान मनी लाँड्रिंगचाही गुन्हा दाखल केला होता.

अनेकदा झाली अटक

पोलिसांनी देशातील या सर्वात मोठ्या कार चोराला आतापर्यंत अनेकदा अटक केली. 2015 मध्ये त्याला काँग्रेसच्या एका आमदारासोबत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्याची 5 वर्षांच्या शिक्षेनंतर 2020 मध्ये सुटका झाली. त्याच्याविरोधात तब्बल 180 गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...