आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात काेराेनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील लस निर्मात्या कंपन्यांनी आपल्या क्षमतेत दुपटीने वाढ केली आहे. स्वदेशी काेराेना लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन क्षमता १६० काेटी डाेसवरून २५० काेटी डाेस एवढी केली आहे. भारत बायाेटेकनेदेखील २० काेटी डाेसवरून ७० काेटी डाेसची क्षमता केली आहे. त्याशिवाय इतर सात कंपन्यांच्या लसी बाजारात येऊ घातल्या आहेत. त्या कंपन्यांनीदेखील उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू केला आहे. अशा प्रकारे देशातील काेविड लस निर्मात्या प्रकल्पांची क्षमता २०० काेटी डाेसपर्यंत वाढली आहे. राेजगाराचा विचार केल्यास सर्व कंपन्यांत एकूण ७ हजार लाेकांना नवा राेजगार मिळाला आहे. फार्मा क्लस्टर जिनाेम व्हॅलीचे उद्दिष्ट पुढील एक दशकात चार लाख राेजगार देण्याचे आहे.
जगाला एक तृतीयांश लसीचा पुरवठा करणाऱ्या जिनाेम व्हॅलीची क्षमता वार्षिक ५०० काेटी डाेसची आहे. जिनाेम व्हॅलीमध्ये काेविडव्यतिरिक्त इतर लसीही तयार हाेतात. आता जिनाेम व्हॅलीमध्ये केवळ काेविड लसीचे उत्पादन १३५ काेटी डाेस असेल. त्याशिवाय इतर लसींचे उत्पादन आधीसारखेच असेल. अशाच प्रकारे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व गुजरातच्या कॅडिलानेदेखील क्षमतेत दुपटीने वाढ केली आहे.स्पुटनिक-व्ही, हेजकाे-१९, जाइकाेव्ह-डी इत्यादी सात लसी सप्टेंबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. बहुतांश लसींचे परीक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यापैकी स्पुटनिक-व्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
हैदराबादच्या फार्मा क्लस्टरमध्ये १० लाख रोजगार
हैदराबादमध्ये फेब्रुवारीत झालेल्या बायोएशिया संमेलनाच्या आधी जीनोम व्हॅलीत जागतिक स्तरावरील तीन डझन कंपन्या सहभागी झाल्या. तेवढ्या कंपन्यांच्या क्षमतेत वाढ झाली. आता देशात ८० टक्के मेडिकल उपकरणे आयात होतात. लवकरच देश निर्यातक्षम होईल. तेलंगणाचे प्रधान सचिव जयेश रंजन म्हणाले, हैदराबादेत जीनोम व्हॅली २.० वर काम होत आहे. येथे १९ हजार एकर भागात फार्मा क्लस्टरच्या योजनेवर काम सुरूआहे. संपूर्ण प्रदेशात ८०० फार्मा, बायोटेक, मेडटेक कंपन्या आहेत. आता ५ हजार कोटी डाॅलरची उलाढाल आहे. जीनोम व्हॅली-२ प्रकल्प होईल व हा उद्योग सुमारे १० हजार कोटी डॉलरचा होईल.
भारताची ९२ गरीब देशांना २० कोटी डोस देण्याची ग्वाही
आपला देश अनेक दशकांपासून लसींच्या उत्पादनात अनुभवी राहिला आहे. देशाची क्षमता दिवसेंदिवस वाढत गेली. काेविड लस तयार करण्याची आपली क्षमता दुपटीहून जास्त झाली. सीरम, कॅडिला, डाॅ. रेड्डी, भारत बायाेटेक, बायाेलाॅजिक इत्यादी कंपन्यांनी इतर लसींचे उत्पादन सुरू ठेवत काेविडसाठी स्वतंत्र प्रकल्प उभारले. माेठ्या उत्पादनासाेबत माफक दरात व प्रभावशाली लस निर्मितीत भारत जगात सर्वाेत्कृष्ट ठरला आहे. जगात सर्वात कमी खर्चात लस व आैषधी भारतात तयार केल्या जातात. त्यामुळे त्याची किंमतही कमी ठेवली जाते. अमेरिकेत लस बनवण्यासाठी ५० डाॅलरचा खर्च येताे. भारतात तयार लस ३ डाॅलरपेक्षा कमी दरात म्हणजे २०० रुपयांत सरकारने खरेदी केली आहे. बाजार विक्री व निर्यातीच्या पातळीवर पाहिले तरी भारताची लस किमतीच्या बाबतीत एक चतुर्थांशहून कमी आहे. साइड इफेक्टचा िवचार केल्यास आतापर्यंत सुमारे ६५ लाख डाेस देण्यात आले. एकही साइड इफेक्टचे प्रकरण नाेंदले गेलेले नाही. म्हणजेच भारताच्या लसीचा परिणाम सर्वाेत्कृष्ट आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.