आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या तेलाची खरेदी:रशियाकडून भारताची रोज तेलाची विक्रमी आयात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची खरेदी जानेवारीत लागोपाठ चौथ्या महिन्यात पश्चिम आशियातील पारंपरिक पुरवठादारांपेक्षा अधिक राहिली आहे. पाश्चात्त्य देशांचे निर्बंध असतानाही भारतीय रिफायनरी कंपन्या सातत्याने सवलतीच्या दराने उपलब्ध रशियन कच्च्या तेलाची खरेदी करत आहेत. ऊर्जा पुरवठ्यावर निरीक्षण असलेल्या वॉर्टेक्सानुसार, जानेवारीत रशियाकडील भारताची कच्च्या तेलाची आयात वाढून दर रोज १२.७ लाख पिंप इतकी झाली आहे. हा एक विक्रम आहे. भारताच्या आयातीत रशियन कच्च्या तेलाचा वाटा वाढून २८ टक्के झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...