आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's Eight member Team For 'Mission Choksi', Choksi Is Currently In A Hospital In Dominic's Capital, Roso

नवी दिल्ली:‘मिशन चोकसी’साठी भारताचे आठ सदस्यांचे पथक, चोकसी सध्या डॉमिनिकची राजधानी रोसोतील एका रुग्णालयात

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी (मिशन चोकसी) भारताचे आठ सदस्यीय पथक डॉमिनिकला गेले आहे. यात सीबीआयची (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) एक महिला अधिकारीही आहे. त्या बँक गैरव्यवहाराचे प्रकरण बघणाऱ्या शाखेच्या प्रमुख आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व इतर यंत्रणांचे अधिकारीही आहेत.

चोकसी सध्या डॉमिनिकची राजधानी रोसोतील एका रुग्णालयात दाखल आहे. वृत्तानुसार भारतीय पथक २८ मे रोजी डॉमिनिकला दाखल झाले आहे. हे पथक बुधवारी डॉमिनिक उच्च न्यायालयात चोकसी प्रत्यार्पण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहील आणि वकिलांना मदत करेल. चोकसीला भारतात आणण्यासाठीचे पुरावे उपलब्ध करून देईल. चोकसी डॉमिनिकाचा नागरिक नसल्याने त्याला बेटावरील कोणत्याही मूलभूत अधिकाराचा दावा करता येणार नाही. मात्र, भारताचा डॉमिनिकासोबत प्रत्यार्पण करार झालेला नाही. यामुळे त्याला थेट भारतात आणणे स्थानिक न्यायालयाचा निकाल आणि सरकारच्या विवेकावर जास्त अवलंबून असेल.

चोकसीने २०१७ मध्ये भारतातून पळून जात अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले होते. तो तेथे २०१८ पासून होता. भारतसोबत अँटिग्वाचा प्रत्यार्पण करार आहे. तेथे त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र दरम्यानच्या काळात तो मैत्रिणीसोबत डॉमिनिकला गेल्याचे वृत्त आले. मग समजले की इंटरपोलने त्याला भारताच्या विनंतीवरून अटक केली आहे.

श्रद्धा रावत यांचा समावेश
पथकात श्रद्धा रावत या महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्या १३५०० कोटींच्या पीएनबी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पथकाच्या प्रमुखही आहेत. सर्व काही व्यवस्थित राहिले तर पथक चोकसीला घेऊन खासगी विमानाने आधी कतार जाईल, मग भारतात येईल. दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...