आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात:मे महिन्यात भारताची निर्यात 21% वाढून 3 लाख कोटी

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मे महिन्यात भारताची निर्यात वार्षिक २०.५५ टक्क्यांनी वाढून ३८.९४ अब्ज डाॅलरवर (३.०४ लाख कोटी) झाली, तर सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य २३.२८ अब्ज डाॅलर (१.८१ लाख कोटी रुपये) नाेंद झाले आहे. तथापि, मे महिन्यात वस्तूंची आयात वाढून ६३.२२ अब्ज डाॅलर झाली आहे, ज्यामुळे व्यापार तूट गेल्या वर्षातल्या मे महिन्याच्या तुलनेत साडेतीन पटीने (२७१%) वाढून २४.२९ अब्ज डाॅलरच्या ( ४.९३ लाख कोटी रु) विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांबद्दल (एप्रिल-मे) सांगायचे तर वस्तूंची निर्यात ७८.७२ अब्ज डाॅलर (६.१४ लाख कोटी रुपये) होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा २४.८६ % जास्त आहे. त्याच वेळी, या कालावधीत आयात १२३.४१ अब्ज डाॅलर (९.६४ लाख कोटी रु) होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ४५.४२% जास्त आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत व्यापार तूट ४४.६९ अब्ज (३. ४९ लाख कोटी रुपये) वर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...