आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ओस पडल्या आहेत. सर्व मोठी शहरे आणि मशहूर पर्यटन स्थळे जिथे रोज हजारो-लाखो लोक गर्दी करताना दिसतात, आज ते सर्व थांबले आहेत. देशातील सर्वात मोठे आणि गर्दी असणारे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस प्रवाश्यांची वाट पाहात आहे. प्रेमाचे प्रतीक ताजमहाल आज आज एकटे पडले आहे, पर्यटकांसाठी आज ते आसुसले आहे.
दिल्लीचे हृदय कनॉट प्लेसचा श्वासदेखील थांबला आहे. या देशबंदीमध्ये अशीच ही 10 प्रसिद्ध स्थळे आणि त्यांची कधीच न पाहिलेली छायाचित्रे तुमच्यासाठी...
1. छत्रपती शिवाजी टर्मिनस : याच्या 19 प्लॅटफॉर्मवरून दररोज 1250 ट्रेन धावतात, येथूनच 167 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ट्रेन सुरु झाली होती...
2. गेटवे ऑफ इंडिया : येथे केवळ पक्षी उडत आहेत आणि दूरपर्यंत केवळ समुद्राच्या लहरींचा आवाज ऐकू येत आहे...
मुंबई येथील ऑफ इंडियाची निर्मिती 1911 मध्ये किंग जॉर्ज आणि राणी मेरीच्या भारत प्रवासासाठी झाली होती. लॉकडाउनमुळे गेट-वे ऑफ इंडिया आणि याच्या आसपासचा पूर्णपणे रिकामा आहे.
3. कॅनॉट प्लेस : जगातील 9 व्या सर्वात महागड्या जागेवर आता कुणीच जात येत नाही, दुकाने आणि ऑफिसेसचे दरवाजे बंद आहेत...
हा फोटो दिल्ली येथील कॅनॉट प्लेसचा आहे. दिल्लीचे कनॉट प्लेस (सीपी) जगातील 9 वे सर्वात महागडे स्थळ आहे. याचे नाव ब्रिटनच्या शाही कुटुंबाचे सदस्य ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या नावर ठेवले गेले आहे.
4. इंडिया गेट : हुतात्म्यांचे स्मारक एकटेच उभे आहे, फक्त त्यांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती जळत आहे....
जेव्हा भारतातील ऐतिहासिक स्थळे आणि इमारतींचा विचार केला जातो तेव्हा त्यामध्ये इंडिया गेटचे नाव देखील येते. युद्धाचे स्मारक म्हणून प्रसिद्ध असलेले इंडिया गेट देशाच्या राजधानी दिल्लीत राजपथ जवळ आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे इंडिया गेट पूर्णपणे बंद केले गेले आहे.
5. काशी येथील गंगा आरती : कोरोनादरम्यानही आरती तर रोज होते, केवळ यामध्ये भाविकांच्या येण्यावर प्रतिबंध आहेत...
काशी येथील गंगा आरती आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. पण प्रथमच हे घडत आहे, जेव्हा दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या गंगा आरतीचा आकार कमी करण्यात आला आहे. आरती अजूनही एक-दोन पूजर्यान्दावरेच केली जाते.
6. ताजमहाल : 49 वर्षानंतर ताजमहल बंद झाले, दरवर्षी येथे 90 लाखपेक्षा जास्त पर्यटक येतात...
कोरोनाच्या भीतीने ताजमहालदेखील बंद झाले आहे. कोरोना सुरु झाल्यानंतर ज्या दिवशी हे बंद झाले, त्या दिवशी ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या सर्व पर्यटकांना निराश व्हावे लागले होते. काही परदेशी पर्यटक तर ताजमहालाबाहेर रडतानाही दिसले होते.
7. डल झील : सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकारे तलावाच्या किनाऱ्यावर ठेवलेले आहेत, हाऊसबोट्स देखील रिकाम्या आहेत...
कोरोना व्हायरसचा परिणाम कश्मीरच्या सर्व पर्यटन स्थळांवरही पडला आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडित लोकांनुसार कश्मीरमध्ये कित्तेक महिन्यांच्या बुकिंग कॅन्सल झाल्या आहेत.
8. ट्यूलिप गार्डन : एशियाच्या सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनमध्ये 13 लाख फुले फुलली आहेत, पण हे पाहण्यासाठी कुणीही येणार नाही...
एशियाचे सर्वात मोठे श्रीनगर येथील इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डनमध्ये फुलांचा ऋतू आला आहे, कोरोना संकटामुळे यावेळी गार्डनमध्ये फुले पाहण्यासाठी कुणीच येणार नाही. त्यामुळे पार्क रिकामे आहे.
9. सुवर्ण मंदिर : इतर दिवशी येथे एका तहावड्यात एक ते दीड लाख लोक येतात, पण यावेळी तर वैशाख ऋतूदेखील रिकामा गेला...
लॉकडाउनमुळे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये निरव शांतात आहे, दरवर्षी वैशाखमध्ये गुरुद्वारा साहेब येथे सुमारे 60 हजार ते 70 हजार भाविक येतात, पण यावेळी खूपच कमी लोक पोहोचले.
10. चारमीनार : 115 कोरोना संक्रमित सापडल्यामुळे संपूर्ण भाग सील, आसपासची 15 हजार दुकाने बंद...
हैदराबादमध्ये जगातील प्रसिद्ध चारमीनारच्या आसपासचा संपूर्ण भाग पूर्णपणे सील केला आहे. चारमीनारला मार्चच्या मध्यातच लोकांसाठी बंद केले गेले होते, यानंतरपासून या भागातील सुमारे 15 हजार दुकाने बंद झालेली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.