आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's First Private sector Missile Developed, Will Be Tested In The Next 12 Months

लष्करी ताकद:भारतात खासगी क्षेत्रातील पहिले क्षेपणास्त्र तयार, पुढील अवघ्या 12 महिन्यांत होईल चाचणी

मुकेश कौशिक | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • ट्रायपॉडची गरज नाही, अडीच किलोमीटर रेंज, दहशतवादविरोधी मोहिमेतही होऊ शकतो वापर

संरक्षण निर्मितीत भारताच्या खासगी क्षेत्रातून मोठे वृत्त आहे. खासगी क्षेत्राने पहिले क्षेपणास्त्र तयार केले आहे. हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र चाचणीसाठी सज्ज आहे. १२ महिन्यांत त्याची चाचणी होऊ शकते.

संरक्षण मंत्रालयाने देशात शस्त्र व संरक्षण उपकरणांत मोठ्या प्रमाणात उत्पादनाला चालना देण्यासाठी आठवडाभरापूर्वीच १०१ संरक्षण उत्पादनाच्या आयातीवर बंदीची घोषणा केली असतानाच हे वृत्त आले आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सोमवारी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण निर्मिती विभाग आणि खासगी क्षेत्रातील दिग्गजांमध्ये चर्चा झाली. यात उद्घाटन सत्रातच खासगी क्षेत्रात क्षेपणास्त्र तयार झाल्याचा खुलासा झाला. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले, स्वदेशी संरक्षण उत्पादनासाठी ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्या २० महिन्यांत सुरू झाले आहेत. यातील पहिल्या प्रकल्पाची निविदा गेल्या महिन्यात काढली आली.

ट्रायपॉडची गरज नाही, अडीच किलोमीटर रेंज

हे क्षेपणास्त्र हैदराबादच्या व्हीईएम टेक्नॉलॉजीने तयार केले आहे. १८ किलोचे हे क्षेपणास्त्र सैनिक सोबत सहजपणे नेतील. त्यात ६ किलोच्या लाँच युनिटचाही समावेश आहे. ते सोडण्यासाठी ट्रायपॉडची गरज नसेल. याचा दहशतवादविरोधी मोहिमेतही वापर होऊ शकतो. त्याची रेंज अडीच किलोमीटर आहे.

बातम्या आणखी आहेत...