आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील परिस्थिती कठीण आहे हे खरे आहे, परंतु लवकरच त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. जगातील दोन मोठ्या संस्थांनी भारतासाठी दिलासादायक भविष्यवाणी केली आहे. यावर्षी 2020 मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासोबतच विकास दर (जीडीपी ग्रोथ रेट)मध्ये तेजी येणार असल्याचे या दोन्ही संस्थांनी म्हटले आहे. फिच आणि एसअॅण्डपी या दोन्ही संस्थांनी म्हटले की, पुढील दोन वर्षांत 2022 मध्ये भारताचा विकार दर 8.5% ते 9.5% होईल. या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरी सर्वात मोठ्या रेटिंग संस्था आहेत.
फिच आणि एसअॅण्डपी दोन्हींच्या अंदाजात एक टक्क्याचा फरक आहे. फिचने पुढील दोन वर्षांत भारताचा विकास दर 9.5% तर एसअॅण्डपीने 8.5% होणार असल्याचे सांगितले. परंतु रेटिंग संस्थांचे म्हणणे आहे की, रिकव्हरीचा वेग मिळवण्यासाठी भारताने आर्थिक क्षेत्रात आणि कामगार बाजारातील सुधारणांवर भर दिला पाहिजे.
चालू आर्थिक वर्षात जीडीपीत 5% घट होण्याचा अंदाज
फिच रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. फिचने बुधवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे आलेल्या घसरणीनंतर भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.5% राहील. परंतु वेगवान विकास दर वाढीसाठी आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा करावी लागेल. एजन्सीने चालू आर्थिक वर्षात जीडीपीत 5 टक्के खाली येण्याचा अंदाज वर्तविला आहे.
2022 मध्ये मजबूत रिकव्हरीमुळे 8.5% राहील विकास दर : एसअॅण्डपी
स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स (एसअॅण्डपी)ने म्हटले की, आर्थिक वर्ष 2021 मध्ये मोठी घसरण झाली असली तरी भारतात जोरदार पुनर्प्राप्तीची चिन्ह दिसत आहेत. यामुळे 2022 या आर्थिक वर्षात विकास दर 8.5% आसपास राहू शकतो. परंतु कमकुवत आर्थिक क्षेत्र आणि कामगार बाजार सुधारण्याची गरज असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. असे न केल्यास रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान एसअॅण्डपीने चालू आर्थिक वर्षात जीडीपीत 5% घसरणीचा अंदाज वर्तवला आहे.
आर्थिक वर्ष 2020 मध्ये जीडीपी वाढ 4.2% होती
जानेवारी-मार्च तिमाहीत देशाचा विकास दर 3.1% राहिला. संपूर्ण वर्षात विकास दर 4.2% राहिला. अशाप्रकारे ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीए) 3.9% राहिला. केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, याआधी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत विकास दर 4.7% होता. तर 2019 च्या संपूर्ण वर्षात हा विकास दर 6.1% होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.