आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यूएनमधून जगाला संदेश देईल भारताची लेक, भूतकाळातील कथांतून भविष्याचा घेईल वेध

नवी दिल्ली / मुकेश कौशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात या वेळी मानवतेच्या भवितव्याबाबत विचार मांडण्यासाठी भारताच्या एका लेकीला आमंत्रित करण्यात आले आहे.

भविष्यवादी पुपुल बिष्ट सोमवारी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सअंतर्गत आयोजित संमेलनात कहाणीच्या माध्यमातून भविष्यातील गृहीतक सादर करेल. जगातील ३० देशांतील सिव्हिल सोसायटी लीडर्ससोबत पुपुल सहभागी होईल. यात नोबेल पुरसकार विजेत्या मलाला युसूफझाई, गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेट्स, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डाॅ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस आणि यूएन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे सरचिटणीस अचिम स्टीनर यांचा समावेश आहे. २९ वर्षीय पुपुल बिष्ट प्रसिद्ध भविष्यवादी आहे. ती राजस्थानच्या ‘कावड’ कथांद्वारे प्रेरित भविष्य विश्लेषणाची पद्धत अवलंबते. या अनोख्या विद्येने भविष्यातील चित्र साकारणाऱ्या पुपुलने २०१८ मध्ये डिकॉलोनायजिंग फ्यूचर्स इनिशिएटिव्हची स्थापना केली. कावड कथेच्या माध्यमातून भविष्याचे विश्लेषण करण्याची ही पहिली बिगर पश्चिमी विद्या आहे. याच्या बळावरच पुपुलला नेक्स्ट जनरेशन फाॅरसाइट प्रॅक्टिशनर्स अवाॅर्डसाठी निवडले गेले. पुपुलने भास्करला सांगितले की, भारतातील लोककथांत भविष्याचे संपूर्ण चित्र सामावलेले आहे. त्याच्या आधारेच पुढील अनेक दशकांचे भविष्य उलगडले जाऊ शकते. आमचा भूतकाळच आमचे भविष्य निश्चित करत असतो.

कहाणी संस्कृतीचा भाग, तिला प्रतिष्ठा मिळवून देऊ
पुपुल म्हणाली, ‘मी भारतीय ओळख आणि विचारांसह भविष्य जाणून घेण्यावर बोलणार आहे. आम्ही अशा वैश्विक वातावरणात जगतोय, जेथे अमेरिकी विचारांचे वर्चस्व आहे. ही भूतकाळाची कथा आहे. आम्हाला योग्य भविष्याचे गृहीतक बघताना या कथेतून मुक्ती मिळवावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...