आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंडच्या टिहरी तलावावर देशातील सर्वाधिक लांबीच्या सस्पेन्शन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शेवटच्या तपासणीसाठी दक्षिण कोरियातून अभियंत्यांची टीम येथे पोहोचली आहे. प्रत्यक्ष वापराआधी तपासणी पंधरा दिवस चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबरमध्ये उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पूल वापरासाठी सज्ज झाला आहे. त्याचा लाभ सुमारे तीन लाख लोकांना मिळणार आहे. आतापर्यंत टिहरी ते प्रतापनगर जाण्यासाठी सुमारे पाच तास लागत होते. पूल तयार झाल्यामुळे दोन तासांत हे अंतर पूर्ण करता येणार आहे. अवजड वाहनांचा १५० किमीचा फेरा वाचणार आहे. पुलाचे काम २००६ मध्ये सुरू झाले होते. २०१० मध्ये डिझाइन अयशस्वी ठरल्यामुळे काम बंद करावे लागले होते. तोपर्यंत त्यावर १३५ कोटी रुपये खर्च झाले होते. २०१६ मध्ये राज्य सरकारने १३५ कोटी रुपये खर्चून पुन्हा बांधकाम सुरू केले. डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली. नवीन डिझाइन दक्षिण कोरियाची कंपनी योसिनने तयार केली आहे. प्रकल्प अभियंता एसएस मखलोगा म्हणाले, पुलावरून एकावेळी १८ टन भार वाहून नेला जाऊ शकतो. प्रकल्पाला साकारणे सोपे काम नव्हते. पुलाच्या स्तंभांची उंची कुतुबमिनारपेक्षा ३४ फूट कमी आहे. एवढ्या उंचावर पूल तयार करण्यासाठी अभियंत्यांना खूप काही सोसावे लागले. टिहरी तलावाचे क्षेत्रफळ ४४ किमी आहे. पूल बनवण्यात आलेल्या ठिकाणी तलावाचे दोन्ही किनारे खूप जवळ होते. त्यामुळे हवेचा दाब जास्त होता. त्यामुळे एकदा वरिष्ठ अभियंता पुलावरून तलावात कोसळले होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला होता. याआधी लेहचा मैत्री ब्रिज भारतातील सर्वाधिक लांबीचा सस्पेन्शन ब्रिज होता. त्याची लांबी सुमारे ८० मीटर आहे.
> एकूण लांबी : 725 मीटर
> एकूण खर्च : 270 कोटी रु.
> एकूण रुंदी : 7 मीटर
> सस्पेन्शन ब्रिज : 440 मीटर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.