आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's Map Was Tampered With, Jammu And Kashmir And Ladakh Were Shown As Separate Countries From India; News And Live Updates

ट्विटरचे नवे कारस्थान:आधी केंद्रीय मंत्र्यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद केले, आता देशाच्या नकाशासोबत केली छेडछाड; जम्मू-काश्मीर, लडाखला दाखवले वेगळे देश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या युजर्सने सर्वप्रथम ही बाब उघडकीस आणली

केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नवीन नियमांवरुन ट्विटर आणि केंद्र आमने सामने आले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद चांगलाच उफाळून येत आहे. दरम्यान, ट्विटरने भारतीय नकाशासोबत छेडछाड करत जम्मू-काश्मीर आणि लडाखला राज्याला भारतापासून वेगळे केले आहे. तसेच या नकाशामध्ये लडाख आणि जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र देश दाखवले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारला घटनेची माहिती मिळताच याची दखल घेतली असून संबंधित प्रकरणात ट्विटरला नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी, ट्विटरने शुक्रवारी भारताचे कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते एका तासासाठी ब्लॉक केले. त्यानंतर आता भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि केंद्र सरकारमधील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये.

या युजर्सने सर्वप्रथम ही बाब उघडकीस आणली
ट्विटरच्या या कृत्याला सोशल मीडियावर सर्वप्रथम @thvaranam नावाच्या युजर्सने ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर ट्विटरने जारी केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही पोस्ट 28 जून 2021 रोजी सकाळी 10:38 वाजेदरम्यान शेअर करण्यात आली असून यावर ट्विटर करिअर पेजवर भारताचा नकाशा असे लिहलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...