आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's Nuclear Arsenal Increases 4 More Nuclear Weapons A Year In India's Camp, China Is Building 300 New Silo Missiles | Marathi News

भारताची अण्वस्त्र ताकद वाढली:भारताच्या ताफ्यात एका वर्षात आणखी 4 अण्वस्त्रे, चीन बनवत आहे 300 नवीन सायलो मिसाइल

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम स्थित इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने सोमवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम जगभरातील अण्वस्त्रांच्या साठ्यावर दिसून येईल. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या अण्वस्त्रसाठ्यात वाढ करत आहेत, असा दावा सिप्रीने केला आहे. भारताचा अण्वस्त्रांचा साठा जानेवारी 2021 मध्ये 156 होता तो जानेवारी 2022 मध्ये 160 पर्यंत वाढला. भारत अजूनही अण्वस्त्रांचा साठा वाढविण्याचे काम करत आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानही अण्वस्त्रे वाढवण्यासाठी आग्रही आहे. जानेवारी 2021 आणि जानेवारी 2022 मध्ये पाकिस्तानचा साठा 165 आहे.

चीन 300 नवीन सायलो क्षेपणास्त्रे बनवत आहे
जगातील तिसरी मोठी लष्करी शक्ती असलेला चीनही आपली ताकद वाढवत आहे. सॅटेलाईट फोटोंनुसार चीन 300 हून अधिक नवीन सायलो क्षेपणास्त्रे बनवत आहे. जानेवारी 2021-22 मध्ये चीनकडे 350 अण्वस्त्रे होती.

SIPRI नुसार, भारत त्यांच्या अण्वस्त्रांबद्दल अधिकृत डेटा शेअर करत नाही. देशातील अण्वस्त्रांची खरी संख्या या अहवालात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी आहे. भारत आणि पाकिस्तान फक्त काही क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती देतात. अहवालानुसार अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या 9 देशांकडे अण्वस्त्रे आहेत.

शीतयुद्धानंतर शस्त्रे कमी झाली
2022 च्या सुरुवातीला या देशांकडे 12,705 अण्वस्त्रे होती, 2021 च्या तुलनेत 375 ने कमी झाली. 1986 च्या तुलनेत ही संख्या खूपच कमी झाली आहे. त्यावेळी जगात 70,000 पेक्षा जास्त अण्वस्त्रे होती. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर, रशिया आणि अमेरिका या सर्वात मोठ्या अण्वस्त्र शक्तींनी त्यांची शस्त्रे कमी करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे एकूण अण्वस्त्रांची संख्या झपाट्याने कमी झाली.

जर आपण सर्वात जास्त अण्वस्त्रे असलेल्या देशांबद्दल बोललो तर रशिया आणि अमेरिकेकडे जगातील 90 टक्के अण्वस्त्रे आहेत. रशिया हा जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे असलेला देश आहे. 2022 च्या सुरुवातीला रशियाकडे 5,977 शस्त्रे होती. 2021 मध्ये रशियाकडे 6,257 शस्त्रे होती. रशियाकडे अशी सुमारे 1600 शस्त्रे आहेत, जी ते लगेच वापरू शकतात. अमेरिकेकडे 5,428 अण्वस्त्रे आहेत.

बातम्या आणखी आहेत...