आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्सिंग:भारताच्या प्रीतीचा गत राैप्यविजेत्या पेरिजाेकवर  विजय

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारताच्या युवा बाॅक्सर प्रीतीने घरच्या मैदानावर सर्वाेत्तम खेळीतून वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. या एशियन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या बाॅक्सरने शनिवारी ५४ किलाे वजन गटामध्ये राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने लढतीमध्ये गत वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेत्या पेरिजाेकचा ४-३ ने पराभव केला.

तिचा अंतिम १६ मधील सामना थायलंडच्या जुटामासशी हाेणार आहे. यातील विजयाने तिला पुढची फेरी गाठता येईल. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीतू घणघसने ४८ किलाे वजन गटामध्ये विजयी सलामी दिली. तिने पहिल्या फेरीत दक्षिण काेरियाच्या कांग डाेचा पराभव केला. यासह तिला माेहिमेला सुरुवात करता आली.

बातम्या आणखी आहेत...