आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • India's Pro Hindu Leaders And Ministers Targeted By Al Qaeda; In Search Of Jihadis For Lone Wolf Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्ल्याचा कट:अलकायदाच्या निशान्यावर भारताचे हिंदूत्ववादी नेते आणि मंत्री; लोन वुल्फ अटॅकसाठी जिहादींच्या शोधात

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • बांग्लादेशी तरुणांकडे ऑनलाइन ट्रेनिंग कंटेंट बनवण्याची जबाबदारी, अनेक वेबसाइट्सवर व्हिडिओ आणि ऑडियो अपलोड
 • अशाप्रकारच्या कंटेंटमध्ये अटॅकसंबंधी माहिती असते, प्लॅनिंग करण्यापासून ते हल्ला करण्यापर्यंतची संपूर्ण ट्रेनिंग दिली जाते

दहशतवादी संघटना अलकायदा लोन वुल्फ अटॅकद्वरे भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. सरकारमधील मोटे मंत्री, अधिकारी, हिंदुत्ववादी नेते आणि सुरक्षा एजंसीमधील उच्च पदस्थ लोक अलकायदाच्या निशान्यावर आहेत. अलकायदाने बांग्लादेशमध्ये कट्‌टर इस्लामिक विचारांच्या विद्यार्थी आणि प्रोफेशनल तरुणांना ऑनलाइन ट्रेनिंग कंटेंट बनवण्याची जबाबदारी दिली आहे.

याबाबतचा खुलासा बुधवारी आलेल्या वृत्तसंस्थांच्या रिपोर्टमध्ये झाला आहे. गुप्तसंस्थनांच्या सूत्रांनी वृत्तसंस्थांना सांगितले की, याप्रकारच्या ऑनलाइन ट्रेनिंग कंटेंटमधून भारतात जिहादी विचार असणाऱ्या तरुणांना लोन वुल्फ अटॅकसाठी ट्रेनिंग दिली जाईल. याबाबत काही व्हिडिओ आणि ऑडिओ अनेक वेबसाइट्सवर अपलोड झाले आहेत.

व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत असलेल्या संस्थांना सतर्कतेचा इशारा

गुप्तसंस्थांनी इनपुटच्याआधारे देशातील सर्व व्हीव्हीआयपींची सुरक्षा वाढवण्यास सांगितली आहे. यांच्या सुरक्षेत असणाऱ्या सर्व जवानांनी तयार राहण्यास सांगितले आहे. यांना भेटायला येणाऱ्या सर्वांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

असा असतो लोन वुल्फ अटॅक

 • लोन वुल्फ अटॅकर्सच्या डोक्यात कट्टरतावादी विचार भरले जातात
 • त्यांना जितके सांगितले जाते, तितकेच काम ते करतात.
 • लोन वुल्फ अटॅकला टीमशिवाय पूर्ण केले जाते, एकटा दहशतवादी पूर्ण काम करून जातो.
 • या अटॅकमध्ये सर्वप्रकारच्या शस्त्रांचा उपयोग होतो.
 • दहशतवाद्याचा उद्देश टार्गेटसोबत जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहचवण्याचा असतो.
बातम्या आणखी आहेत...