आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालाबार 2020चा समारोप:चार दिवसांच्या सरावात भारताच्या शिवालिक, सुकन्याचे शक्तिप्रदर्शन

मालाबार9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वाड देशांचा संयुक्त लष्करी सराव मालाबार-२०२० शुक्रवारी संपला. चार दिवस चाललेल्या या लष्करी सरावात भारतीय नौदलाची युद्धनौका रणविजय, शिवालिक, शक्ती, सुकन्या व सबमरीन सिंधूराजने भाग घेतला होता. भारतीय सबमरीननेही वॉरफेअर ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. बंगालच्या खाडीत विशाखापट्टणमजवळ मालाबार येथे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानच्या नौदलांनी आपल्या सुसज्ज शस्त्रांनी ताबडतोब फायरिंग केली.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले, अमेरिकी नौदलाचे जॉन एस. मॅक्केन क्षेपणास्त्र विध्वंसक, ऑस्ट्रेलियाची बॅलरेट युद्धनौका व जपानी विध्वंसक युद्धनौकेसह एका पाणबुडीसह भारतीय नौदलाची ५ जहाजे सरावात तैनात होती. कोरोनामुळे चारही देशांच्या नौदलाच्या सैनिकांनी आपसात संपर्क ठेवला नव्हता. चार दिवसांच्या सरावात विविध शस्त्रे, फायरिंग सराव चर्चेचे केंद्रबिंदू ठरले.

बातम्या आणखी आहेत...