आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India's Small Rocket Will Now Save 70% In Cost, ISRO Will Launch 18 Satellites Simultaneously Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्रो:भारताचे आता लहान रॉकेट, खर्चातही होईल 70% बचत, इस्रो आज एकाच वेळी 18 उपग्रह सोडणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या वर्षातील पहिल्या मोहिमेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ५१/ अमेझोनिया- १ रविवारी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी लाँच केले जाईल. या रॉकेटमध्ये ब्राझीलच्या अमेझोनिया-१ उपग्रहासोबत १८ नॅनो उपग्रहही लाँच होतील. यात १३ अमेरिकेचेही आहेत. हे लाँचिंग अंतराळ विभागाने स्थापन केलेली कंपनी न्यू स्पेस इंडिया लि.ची पहिली व्यावसायिक मोहीम आहे. मुख्य उपग्रह भारतीय नसलेली ही पहिली लाँचिंग आहे. पीएसएलव्ही रॉकेटचे हे ५३ वे उड्डाण आहे. भारताने आतापर्यंत ३४ देशांचे ३४२ उपग्रह लाँच केले आहेत.

अॅमेझॉनिया- १ उपग्रहाचे वजन ६३७ किलो आहे. पीएसएलव्हीची क्षमता १७५० किलो वजन अंतराळाच्या कक्षेत घेऊन जाण्याची आहे. यामुळे १८ इतर उपग्रहही समाविष्ट करण्यात आली आहेत. इस्रोनुसार पीएसएलव्ही रॉकेटच्या लाँचिंगमध्ये २१०-२७० कोटी रुपये खर्च येईल, जो प्रतिकिलो लाँचिंग खर्चाबाबत अमेरिकेची अंतराळ कंपनी स्पेसएक्सच्या एवढाच येतो. मात्र, येत्या काही महिन्यांत भारतातून उपग्रह सोडणे किफायतशीर होईल आणि लहान उपग्रह सोडण्यासाठी मोठा उपग्रह सोडण्याची वाट पाहावी लागणार नाही.

इस्रो आगामी दोन महिन्यांत एसएसएलव्हीची (स्माॅल सॅटेलाइट लाँच व्हेइकल) चाचणी घेणार आहे. तसेच तामिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील कुलाशेकरट्टीनममध्ये प्रक्षेपण साइट तयार केली जाईल. यानंतर प्रक्षेपणाचे कामकाज वाढेल आणि ५०० किलोपर्यंतचे प्रक्षेपण एसएसएलव्हीद्वारे होईल. यात मोठ्या आणि राष्ट्रीय महत्वाच्या प्रक्षेपणात पीएसएलव्ही आणि जीएसएलव्हीचा वापर केला जाईल.

एसएसएलव्हीत ६०० ऐवजी फक्त ६ जणांची गरज
इस्रो चेअरमन के. सिन यांच्यानुसार एसएसएलव्हीची डिझाइन लाँच ऑन डिमांड कल्पनेवर आहे. पीएसएलव्हीच्या निर्मितीला ६० दिवस लागायचे तर एसएसएलव्ही तयार करण्यात केवळ ७२ तास म्हणजे तीन दिवस लागतील. पीएसएलव्हीत ६०० जणांची गरज असते तर एसएसएलव्हीसाठी फक्त ६ जणांची गरज आहे. मात्र, त्याद्वारे ५०० किलो वजनाच्या उपग्रहास ५०० किमी लांब लो अर्थ आॅर्बिट आणि ३०० किमी लांब सन सिंक्रोनस आॅर्बिटमध्ये पाठवता येईल.

बातम्या आणखी आहेत...