आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत-चीन सीमा वादादरम्यान आता म्यानमारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बंगालच्या खाडीत भारताने अंदमान बेटापासून ६० किमी अंतरावर म्यानमारकडे कोको बेटावर चिनी हालचालींबद्दल आक्षेप नोंदवला आहे. म्यानमार कोको बेटाच्या समूहावरील चिनी हालचाली रोखाव्यात असे भारताने सांगितले आहे. येथे चिनी विमाने अनेकदा दिसले आणि सूत्रांनुसार, चीन येथे हेरगिरीचे उपकरण बसवत आहे. भारताने म्यानमारला अनेक उपग्रह छायाचित्रे शेअर केली असून त्यात कोको बेटावर हालचाली दिसून येतात. यात धावपट्टीसारखे बांधकाम दिसून येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.