आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indigenous Helicopter Rudra Arrives To Join New Squadron In Jodhpur, To Join Air Force Day Celebrations

गर्व:स्वदेशी हेलिकॉप्टर रुद्र नवीन स्क्वाड्रनमध्ये सामील हाेण्यासाठी पाेहाेचले जोधपूरमध्ये, वायुसेना दिन साेहळ्यात सामील हाेणार

डीडी वैष्णव \ जोधपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर रुद्रच्या स्क्वाड्रनमध्ये सहभागी हाेण्यासाठी ३ एलसीएच (लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर) जोधपूर एअरबेसवर पोहोचली. सहा वैमानिकांनी ती बंगळुरूहून जोधपूरला नेली. हवाई दलातील स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरची पहिला स्क्वाड्रन जोधपूरमध्ये तयार हाेईल. त्यासाठी आणखी ७ हेलिकॉप्टर वायुसेना दिनापूर्वी तेथे पोहोचतील. रुद्रसाठी बंगळुरूमध्ये १५ हून अधिक वैमानिकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. ही पहिली बॅच आहे. नंतर दुसरी तयार हाेईल. ८ ऑक्टोबरला वायुसेनादिनी साेहळ्यात ही लढाऊ हेलिकाॅप्टर हवाई दलात दाखल हाेतील. त्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हवाईदलाचे प्रमुख एअर मार्शल व्ही.आर. चौधरी त्यासाठी जोधपूरला येतील. ताे पश्चिम आघाडीवरील सर्वात माेठा बॅकअप एअरबेस असल्याने येथे ही हेलिकॉप्टर तैनात हाेत आहेत. देशात तयार या हेलिकॉप्टरचे ४५ टक्के भाग सध्या देशातच विकसित असून ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.

जूनमध्ये पहिले स्क्वाड्रन : एलसीएचचे पहिले स्क्वाड्रन या वर्षी जूनमध्ये लष्करात दाखल झाले. लष्कराने एचएएलला ९५ हेलिकाॅप्टरची ऑर्डर दिली. मार्च २०२२ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या सुरक्षा समितीने एचएएलला ३८०० कोटी रुपयांच्या १५ हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली.

त्यापैकी १० हवाई दल व ५ लष्करासाठी आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या बोइंग कंपनीकडून हवाई दलाला ३३ अपाची हेलिकॉप्टर मिळाले. ते चिनी नियंत्रण रेषेवर तैनात आहेत.

एव्हिएशन फोटोग्राफर संजय सिन्हा यांनी दिव्य मराठीसाठी दिलेले हे छायाचित्र.

बातम्या आणखी आहेत...