आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मनिर्भर भारत:पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 25% वाढला स्वदेशी ‘खेळणी’चा बाजार

शरद पांडेय | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोएडा| टॉय पार्कस्थित एका खेळणी कारखान्यात काम करताना कर्मचारी. या कारखान्यांत अचानक मागणी वाढली आहे.
  • 16 हजार कोटी रुपयांचा खेळणी बाजार देशात, 12 हजार कोटींची होते आयात, बहुतांश होते चीनमधून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच रेडिओवर प्रसारित झालेल्या “मन की बात’ कार्यक्रमात स्वदेशी खेळणी व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाचा परिणाम खेळणी उद्योगांवर दिसू लागला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उद्योगात जवळपास २५ टक्क्यांची वाढ नोंदली. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेश सरकारकडून ग्रेटर नोएडात (यमुना एक्स्प्रेस वे ऑथॉरिटी) विकसित केल्या जाणाऱ्या टॉय पार्कमध्ये भूखंडाची मागणी वाढली आहे. या कारणास्तव राज्य सरकार पुन्हा योजना लाँच करण्याच्या तयारीत आहे.

देशात खेळणींचा जवळपास १६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय दरवर्षी होतो. यामध्ये देशातील उत्पादन केवळ २५ टक्के म्हणजे ४ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ७५ टक्के खेळणींची आयात होते. त्यात बहुतांश खेळणी चीनमधून येते. केवळ एक-दोन टक्के खेळणी अन्य देशांतून आयात होते. पंतप्रधानांनी देशाला स्वावलंबी करण्यासाठी देशातील व्यवसाय वाढवणे आणि स्टार्टअप सुरू करण्यावर भर दिला आहे.

यासंदर्भात टॉय असोसिएशन ऑफ इंडियाचे समन्वयक एन. के. गुप्ता म्हणाले, गेल्या काही दिवसांत स्वदेशी खेळणीची मागणी वाढली आहे. सध्याच्या काळात स्वदेशी खेळणीच्या तुलनेत आयात केलेली ४० टक्के स्वस्त पडते. मात्र, खेळणी उद्योग चीनशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारकडून जमीन, मुद्रांक शुल्क, बँक, कर्ज, सोलार प्लँट, भाड्यात सवलत मागत आहे. उद्योगानुसार, येत्या २ ते ३ वर्षांत १६ हजार कोटींचा पूर्ण व्यवसाय स्वदेशी होईल. याशिवाय खेळणीची निर्यातही सुरू होऊ शकते. उद्योगानुसार, आता इलेक्ट्रॉनिक खेळणीशिवाय राज्यांच्या सांस्कृतिक दर्शनाची खेळणीही तयार केली जाईल. त्यात लाकडी, कागदी व कापडाच्या खेळण्यांचा समावेश आहे.दिल्ली सदर बाजार खेळणी बाजार तेलीवाडाचे सरचिटणीस राजेंद्र शर्मा म्हणाले, चीनकडून खेळणीची आयात कमी झाली आहे. सरकारने खेळणी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे स्वदेशी खेळणीची जास्त निर्मिती होऊ शकेल. देशभरात संघटित पद्धतीने खेळणी तयार करण्याचे सुमारे ४०० युनिट आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशाातील नोएडा, ग्रेटर नोएडाशिवाय दिल्ली, मुंबई, राजकोट (गुजरात), कोपल (कर्नाटक) हे प्रमुख आहेत. याशिवाय असंघटित क्षेत्रांत घरांत तयार होणाऱ्या खेळण्यांच्या लहान-मोठ्या युनिटची संख्या सुमारे १० हजारांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. मात्र, आता देशातील सर्वात मोठे खेळणी निर्मितीचे हब नोएडात होत आहे. येथे १०० एकरात टॉय पार्क तयार करण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला होता. नव्याने मागणी वाढल्याने योजनेचे रिलाँचिंग करण्याची तयारी होत आहे. सध्या येथे १८ मोठ्या खेळण्याचे युनिट कार्यरत आहेत.