आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडिगोच्या फ्लाइटमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात झालेल्या वादाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी दोघेही एकमेकांवर ओरडताना पाहायला मिळत आहेत. फ्लाइटमध्ये देण्यात आलेल्या जेवणावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. एअर होस्टेसला प्रवाशाने नोकर म्हटल्याने प्रकरण आणखी वाढले. त्यावर मी एक कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही, असे प्रत्त्युत्तर एअर होस्टेसने प्रवाशाला दिले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोनेही प्रतिक्रिया दिली. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, प्रवाशाने एअर होस्टेससाठी अपशब्द वापरले. घटना इस्तंबूलहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये घडली आहे.
केबिन क्रू प्रवाशांना जेवण देत असताना ही घटना घडली. प्रवाशाने थेट एअर होस्टेसचीच चौकशी सुरू केली. त्यानंतर एअर होस्टेसने प्रवाशाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नम्रपणे बोलण्याची विनंती केली. तरीही प्रवाशाने आरडाओरडा सुरू केला. यावर एअर होस्टेसवर ओरडून तिला गप्प राहण्यास सांगितले.
एअर होस्टेसने प्रवाशाला सांगितले की, तुम्ही क्रूशी असे बोलू शकत नाही. मी तुमचे म्हणणे आदराने आणि शांतपणे ऐकत आहे. तुम्हीही क्रू मेंबरचाही आदर केला पाहिजे. तुम्ही माझ्याशी असे बोलू शकत नाहीस. मी पण इथे कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही. यादरम्यान त्यांच्या एका सहकारी सदस्याने मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
इंडिगोने प्रतिसाद दिला
ज्या क्रू मेंबरसोबत प्रवाशाचा वाद झाला होता. ती टिमची लीडर होती. त्यामुळे विमान कंपनीला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विमान कंपनीने विमानातील प्रवाशाचे वर्तन योग्य नसल्याचे सांगितले. त्यांनी एअर होस्टेसचा अपमान केला आहे. इंडिगोने म्हटले की, ते या घटनेची चौकशी करत आहेत. आमच्या ग्राहकांची सोय ही आमची पहिली आणि प्रमुख प्राथमिकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.