आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indigo Flight Car Under Wheel Delhi Airport Updates । No Damage To The Plane Going To Patna

इंडिगो फ्लाइटचा मोठा अपघात टळला:दिल्ली विमानतळावर विमानाच्या चाकाखाली आली कार, पाटण्याला जात होते विमान

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. येथे इंडिगोच्या फ्लाइटसमोर कार आली होती. गाडी विमानाच्या चाकाखाली येऊन थांबली. ही कार गो फर्स्ट कंपनीची होती. विमानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

इंडिगो विमान 6E2002 दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी तयार होते. विमानात अनेक प्रवासी होते, तर काही जण त्यात चढत होते. दरम्यान, एक कार भरधाव वेगात आली आणि विमानाच्या चाकाखाली येऊन थांबली. हे पाहून तेथे एकच गोंधळ उडाला.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेत चालकाला पकडले. ताबडतोब कार विमानाच्या खालून काढण्यात आली आणि विमान योग्य वेळी रवाना करण्यात आले.

ड्रायव्हरची अल्कोहोल चाचणी नकारात्मक

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कार चालकाला ताब्यात घेऊन त्याची अल्कोहोल चाचणी केली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विमानतळ आणि सुरक्षा अधिकारी कार चालकाची चौकशी करत आहेत. कार विमानाला धडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

विमान जेथे उभे होते तेथे कार नेण्यास परवानगी नाही

विमानतळावर जेथे विमान उभे होते त्या ठिकाणी कोणत्याही वाहनाला नेण्यास परवानगी नाही. विमानात प्रवासीही बसले होते. या चालकाने कोणत्या परिस्थितीत कार तेथे नेली, याचा तपास सुरू आहे. सुरक्षा कर्मचारी ड्रायव्हरला विचारत आहेत की, तो झोपेत गाडी चालवत होता का?

स्पाइसजेटची 50 टक्के उड्डाणे रोखली

विमाने निकामी झाल्यामुळे डीजीसीएने स्पाईसजेटवर कडक कारवाई केली. पुढील आठ आठवड्यांसाठी, त्याच्या 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. 19 जूनपासून 18 दिवसांच्या कालावधीत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची किमान आठ प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर डीजीसीएने 6 जुलै रोजी एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

बातम्या आणखी आहेत...