आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शुक्रवारी घडली. हा प्रवाशी मद्यधुंद स्थितीत होता. तसेच क्रू शी ही गैरवर्तन करत होता. क्रू सदस्यांनी त्याची माहिती फ्लाइट कॅप्टनला दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला पोहोचल्यानंतर सदर प्रवाशाला CISF च्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरोधात 3 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता जाणून संपूर्ण घटनाक्रम
इंडिगोचे विमान 6E 308 दिल्लीहून बंगळुरूला जात होते. त्यात कानपूरचा प्रतीक नामक 40 वर्षीय प्रवाशीही होता. प्रतीक मद्यधुंद स्थितीत होता. त्याने प्रवासात विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी क्रू सदस्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्यांच्याशीच गैरवर्तन केले. विमान बंगळुरूत लँड झाल्यानंतर त्याला CISF च्या ताब्यात देण्यात आले.
ही घटना सकाळी 7.56 वा. घडली. आर प्रतीक शिट क्रमांक 18F वर बसला होता. विमान सकाळी 10.43 वा. पोहोचल्यानंतर CISF च्या ताब्यात देण्यात आले. तिथे त्याची ब्रिथ अॅनालायझर टेस्टही करण्यात आली. त्यात तो पॉझिटीव्ह आढळला. प्रतीक एका ई-कॉमर्स फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करतो.
प्रतीकवर 3 कलमांतर्गत गुन्हा
प्रतीकवर भादंवि कलम 336 (दुसऱ्यांचे आयुष्य किंवा वैयक्तिक सुरक्षा संकटात टाकणे), कलम 290 (सार्वजनिक उपद्रव) व विमान अधिनियम 1934 च्या कलम 11ए (हेतुपुरस्सर बेकायदा कृत्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीकला 41 ए CrPC अंतर्गत नोटीसही बजावण्यात आली आहे.
हवेत अधांतरी आपत्कालीन दरवाजा उघड नाही
एव्हिएशन सेफ्टी कन्सल्टंट कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी सांगितले की, आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडल्याने सुरक्षेशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. विमान हवेत उडत असते तेव्हा सर्वच बाहेर पडण्याचे दरवाजे प्रेशर लॉक्ड होतात. त्यामुळे ते आकाशात उघडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विमान उतरेपर्यंत इमर्जन्सी गेट्स उघडता येत नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.