आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा अपघात टळला:श्रीनगरहून दिल्लीसाठी टेक ऑफ करण्याआधीच बर्फाला धडकले विमान; सर्व 233 प्रवासी सुखरूप

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीनगरमध्ये पारा उणे 7.8 सेल्सियस

श्रीनगर विमानतळावर दिल्लीसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत असलेल्या विमानाचा बुधवारी थोडक्यात अपघात टळला. क्रूसह सर्व २३३ जण सुखरूप आहेत. धावपट्टीवरील बर्फ हटवून बाजूला ठेवलेले होते. मात्र थंडी खूप असल्याने ते वितळलेले नव्हते. यामुळेच ही घटना घडली. इंडिगोचे विमान टेक ऑफसाठी धावपट्टीवरून जात असताना उजवीकडील इंजिन या बर्फाला धडकले.

श्रीनगरमध्ये पारा उणे ७.८ सेल्सियस

श्रीनगरमध्ये मंगळवारची रात्र ९ वर्षांतील सर्वात गार ठरली. पारा उणे ७.८ अंशांपर्यंत घसरला होता. पहाट उजाडेपर्यंत दल सरोवराचा एक मोठा भाग पूर्णपणे गोठून गेला होता. गेल्या आठवड्यात खाेऱ्यात प्रचंड बर्फवृष्टी झाली. दल सरोवराच्या परिसरात अद्यापही खूप बर्फ साचलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...