आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी ४ हिंसक घटना घडल्या. दोन दहशतवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात हिंदूंच्या घरांत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले. ही घटना सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. तीन घरांवर गोळीबार झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.प्रत्यक्षदर्शींनुसार तीनही घरे सरकारी शाळा व मंदिराच्या जवळ आहेत. दहशतवादी कारमधून आले होते. हत्येनंतर ते पळून गेले. सतीश (४५), दीपक (२३), प्रीतम लाल (५६) अशी ३ मृतांची नावे आहेत.
काश्मीरमध्ये दोन ठिकाणी स्फोट, लष्कर-ए-तोयबाचा गट टीआरएफने घेतली जबाबदारी
दिव्य मराठी नेटवर्क | श्रीनगर
काश्मीरमध्ये रविवारी २ दहशतवादी घटना घडल्या. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रजिस्टेंट फोर्सने (टीआरएफ) दोन्ही घटनांची जबाबदारी स्वीकारली. मध्य काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कामिल चौकात सीआरपीएफच्या बंकरला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी ग्रेनेड डागले. परंतु या ग्रेनेडचा रस्त्यात स्फोट झाला. त्यामुळे स्थानिक नागरिक समीर अहमद जखमी झाला. उत्तर काश्मीरात कुपवाडा जिल्ह्यातील किरालगुंड सायंकाळी उशिरा ग्रेनेड हल्ला झाला.
रायफल हिसकावली : दक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ पोस्ट येथे एक तरूण एके ४७ रायफल घेऊन पळून गेला.ही रायफल जप्त केल्याचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले. .
जखमींमध्ये दोन महिला सामील : जम्मूच्या डांगरी गावात झालेल्या हल्ल्यातील जखमींमध्ये सरोज बाला (३५),उर्षी शर्मा (१७) आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.