आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China Border Dispute Update | Rajnath Singh Meets CDS And Army Chiefs, Says Troops Should Respond To Chinese Infiltration On LAC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्काराला पूर्ण सूट:राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि लष्कर प्रमुखांची घेतली बैठक, म्हणाले - एलएसीवर सैन्याने चिनी घुसखोरीचे चोख प्रत्युत्तर द्यावे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुमारे 6 आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये लडाखमध्ये वाद सुरू आहे

सीमेवर चिनी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने सैन्य दलांना संपूर्ण सूट दिली आहे. वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्यानुसार सांगितले की, जमीन, आकाश आणि समुद्री भागात चीनकडून होणारी कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी सैन्याला चोख प्रत्युत्तर घेण्यास सांगितले आहे.

रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांच्यासमवेत सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि नेव्ही चीफ करमबीर सिंह यांच्याशी चर्चा केली. यात त्यांनी चीनशी काटेकोरपणे व्यवहार करण्याची सूचना सैन्याने केली.

15 जूनच्या रात्री गलवानमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली

सुमारो 6 आठवड्यांपासून भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव सुरू आहे. 15 जूनच्या रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली होती. चीनच्या सैनिकांनी काटेदार तारांच्या दांड्याने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यामध्ये 20 जवान शहीद झाले. भारताने देखील चीनचे 40 पेक्षा अधिक सैनिकांना ठार केल्याचे बोलले जात आहे. परंतु चीनने आतापर्यंत आपल्या मृत सैनिकांची संख्या सांगितली नाही. 

बातम्या आणखी आहेत...