आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China Border Dispute Updates | China Moved Tents, Jawans Retreated; The First Step After The Agreement In The Meeting Of The Core Commander

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलवानमध्ये ड्रॅगन नरमला:चीनने तंबू हलवले, जवानही माघारी; कोअर कमांडरच्या बैठकीतील सहमतीनंतर पहिले पाऊल

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार किलोमीटरचा परिसर बनला ‘नो मॅन्स लँड’ : सूत्र - Divya Marathi
चार किलोमीटरचा परिसर बनला ‘नो मॅन्स लँड’ : सूत्र
  • चार किलोमीटरचा परिसर बनला ‘नो मॅन्स लँड’ : सूत्र

लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला विराम मिळण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनुसार, चिनी लष्कराने गलवान खोऱ्यातून आपले तंबू हलवले आहेत. त्यांच्या लष्करानेही माघार घेतली आहे.  

सूत्रांनुसार, दोन्ही लष्करांतील कोअर कमांडर स्तरावरील चर्चेतील सहमती प्रत्यक्षात लागू करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. तथापि, चिनी सैनिकांनी कुठपर्यंत माघार घेतली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातरजमा होईल. समझोत्याअंतर्गत दुसरे पाऊलही याच पडताळणीनंतर उचलले जाईल. सूत्रांनी सांगितले की, चिनी सैनिक पेट्रोलिंग पॉइंट १४ जवळून तंबू व इतर वस्तू हटवताना दिसले आहेत. तसेच गलवान, हॉट स्प्रिंग्ज व गोगरातून चिनी लष्कराची वाहने परत जाताना दिसली. 

गलवानमधून भारत-चीनचे जवान २-२ किमी माघारी

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने काही वृत्तांत म्हटले आहे की, भारत आणि चीनचे लष्कर गलवानमधून दोन-दोन किमी माघारी फिरले आहे. यामुळे तेथे चार किमीचा परिसर ‘नो मॅन्स लँड’ बनला आहे. अद्याप दोन्ही बाजू कुणाची तैनाती व बांधकाम किती उरले आहे, हे पाहण्याच्या स्थितीत नाहीत. दोन्ही पक्षांत रिकाम्या केलेल्या भागाची हवाई निगराणी न करण्याबाबतही एकमत झाले आहे. तथापि, पँगाँग त्सो भागात चिनी सैनिक मागे फिरले की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. तेथेही चिनी सैन्याची मोठी जुळवाजुळव आहे. फिंगर ४ व फिंगर ८ च्या मध्ये चीनचे मोठे सैन्य आहे.

चीन म्हणाला, आघाडीच्या मोर्चावरून सैनिकांची माघार व तणाव कमी करण्यावर काम करताहेत 

बीजिंग | चीनने म्हटले की, एलएसीवर गलवान खोऱ्यातील आघाडीच्या मोर्चांवर तैनात सैनिकांची माघारी व तणाव कमी करण्याच्या उद्देशाने प्रभावी पावले उचलत आहाेत. गलवानमधून चिनी लष्कर मागे गेल्याच्या वृत्तांदरम्यान चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही टिप्पणी केली. ते म्हणाले, भारतही सहकार्याचा हात देईल, ठोस कार्यवाहीद्वारे सहमती लागू करेल, अशी आशा आहे.

संघर्षानंतर प्रथमच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांत चर्चा

लडाखमधील संघर्षानंतर रविवारी प्रथमच दाेन्ही देशांत दूरध्वनीवर विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली. भारताच्या कठोर भूमिकेमुळे एलएसीवर जवानांना पूर्णपणे हटवून हद्दीकडील क्षेत्रात शांतता व स्थैर्य सुनिश्चित करणे गरजेचे असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताकडून या चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, तर चीनकडून परराष्ट्रमंत्री वांग यी हे सहभागी झाले. डोभाल यांनी कठोर भूमिका घेत एलएसीचा सन्मान करावा लागेल, असे चीनला ठणकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील सहमतीचे पालन करावे.  सीमेवर शांतता तसेच स्थैर्य आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर दोन्ही प्रतिनिधींनी एकमत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...