आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China Border Dispute Updates | Indian Chinese Soldiers On Line Of Actual Control (LAC) In Ladakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखमध्ये वाद:स्वत:ला प्रोफेशनल म्हणवणाऱ्या चीनच्या सैन्याची वृत्ती पाकिस्तान समर्थक दगडफेक करणाऱ्यांसारखी, भारतीय सैनिकांना काटेरी तारांनी मारहाण केली होती़

लडाखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
5 मे रोजी पूर्व लडाखच्या पेनगोंग त्सो तलाव क्षेत्रात चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये वाद झाला. (फाइल फोटो) - Divya Marathi
5 मे रोजी पूर्व लडाखच्या पेनगोंग त्सो तलाव क्षेत्रात चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये वाद झाला. (फाइल फोटो)
  • चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर काठ्या आणि दगडफेक केली होती
  • चीन भारतीय सीमेत करतोय घुसखोरी, नियंत्रण रेषेजवळ 5000 सैनिक केले तैनात

सीमेवर भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान व्यावसायिक असल्याचा दावा करणार्‍या चिनी सैन्याचे वास्तव नुकतेच उघडकीस आले. पूर्व लडाखच्या पेनगोंग त्सो लेक भागात 5 मे रोजी झालेल्या चकमकीच्या वेळी चिनी सैनिकांनी काठी, काटेरी तार आणि दगडांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. वृत्तसंस्था एनएनआयने सूत्रांचा हवाला देऊन हा अहवाल दिला आहे. यानुसार चिनी सैन्याचा व्यवहार काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांना मारणाऱ्या पाक समर्थक दगडफेक्यांसारख्याच होता. 

चिनी सैनिक गुंडांसारखे वागले

भारतीय जवानांपेक्षा चिनी सैनिक जास्त होते, तरीही त्यांनी अन-प्रोफेशनल वागणूक दिली आणि विनाकारण राग दाखविला. त्यांची वृत्ती अगदी गुंडांसारखीच होती. त्यांनी भारतीय जवानांच्या सभोवताल टोळ सदृढ तळ बनविला होता. दुसरीकडे वर्षभर लहान-मोठी भांडणं होत असताना देखील भारतीय सैनिक कधीही अशाप्रकारचा व्यवहार करत नाहीत. 

चीनच्या या वृत्तीमुळे तणाव वाढण्याची भीती 

या महिन्यात लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैन्यात तीनवेळा वाद झाला. चीनने नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) भारतीय भागात घुसखोरी करत अस्थाई ठिकाणे तयार केले. चीनने एलएसीजवळ सुमारे 5 हजार सैनित तैनात केले आहेत. प्रत्युत्तरासाठई भारतीय सैन्याने जवानांची संख्या वाढवली आहे. चीनचा व्यवहार पाहता आगामी काळात आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...