आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनने पुन्हा एकदा विश्वासघात केला आहे. २९-३० ऑगस्टला लडाखच्या पेगाँग भागात सीमा ओलांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर १० दिवसांतच आता एलएसीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी अडवले तेव्हा गोळीबारही केला. हे चिनी सैनिक तेथेच अडून आहेत. माॅस्कोमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चेत चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांनी तणाव कमी करण्याच्या गप्पा केल्या होत्या. त्याच्या उलट आता हा तणाव आहे.
साडेचार दशकांनंतर भारत-चीनदरम्यान वादग्रस्त सीमेवर हवेत गोळीबार झाल्याच्या प्रकारानंतर २४ तासांनी पूर्व लडाखमध्ये पेगाँगच्या ७० किमी आघाडीवर स्थिती प्रचंड तणावपूर्ण आहे. ज्या मुकपरी-रेजांग ला भागात गोळीबार झाला त्या भागात ५० चिनी सैनिक भारतीय चौक्यांच्या दिशेने निघाले होते. लष्करी सूत्रांनुसार, चिनी सैनिकांनी काटेरी कुंपण तोडण्याचाही प्रयत्न केला. भारतीय जवानांनी परतण्यासाठी बजावले तेव्हा चिनी सैनिकांकडे रायफल्स होत्या. त्या सैनिकांनी लगेच हवेत गोळीबार सुरू केला. चिनी सैनिक अजूनही तेथेच तळ ठोकून असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भागात किमान तीन ठिकाणी सुमारे ५०-६० चिनी सैनिक गटागटाने एकत्र थांबलेले असून ते संधीची वाट पाहत आहेत. दरम्यान, या स्थितीत येथे मोठी चकमक होऊ शकते.
चीनचा खोटारडेपणा अन् त्याबाबत वस्तुस्थिती
> असत्य 1 : कर्नल झांग शुईली यांनी सांगितले, भारतीय सैनिकांनी दोन्ही देशांतील कराराचे उल्लंघन करत चिनी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला.
वस्तुस्थिती : चीनचे ५० सैनिक मुकपरी-रेजांग ला भागात घुसत होते.
> असत्य 2: भारतीय सैनिकांनी चर्चेसाठी पुढे येणाऱ्या चिनी बॉर्डर गार्ड्सवर बंदूक रोखली.
वस्तुस्थिती : बॉर्डर गार्ड्सना चर्चेसाठी येण्याची काय गरज होती? सैनिक पातळीवर चर्चा होत नसते.
भारत सज्ज : चुशूलपासून रेजांग ला, रिछिन ला, त्साका ला इत्यादी टोकांवर भारतीय सैनिकांनी गेल्या १० दिवसांपासून ५० चौक्या उभारल्या आहेत.
भास्कर ग्राउंड रिपोर्ट : एलएसीवर सैन्याची सर्वात मोठी जमवाजमव
१९७५ नंतर पहिल्यांदाच एलएसीवर गोळीबार झाल्याने लोकांत दहशत आहे. लडाखमधील चुमाथांग गावातील सोनम सांगतात, आजपर्यंत एवढे सैनिक पाहिले नव्हते. आमची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. तणावामुळे गुरे चारायलाही जाता येत नाही. जेथे गोळीबार झाला ते ठिकाण चुशूलपासून ५ किमीवर आहे. सोनम शेरिंग लष्करासाठी पोर्टरचे काम करायचे. ते सांगतात, सोमवारी सायंकाळी गुरुंग हिलवर चिनी सैन्य चढण्याचा प्रयत्नात हाेते. तेथेही गोळ्यांचा आवाज आला. गावात रात्रभर कोणीच झोपले नाही. चुशूलजवळ मानमेराक ग्रामस्थांना भीती आहे की, १९६२ चे युद्ध आॅक्टोबर महिन्यात झाले होते. पुन्हा एकदा ऑक्टोबर महिना युद्ध न घेऊन येवो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.