आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमावाद:भारताच्या आक्रमक पवित्र्याने चीनची घाबरगुंडी; आपण युद्ध करू शकतो, असा नागरिकांना देतोय भरवसा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही देशांच्या सीमेवर चीन आपली एक इंचही जमीन गमावणार नाही - ग्लोबल टाइम्स

भारताच्या आक्रमक पवित्र्याने चीनची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. आपले लष्कर युद्ध करू शकते, अशी आपल्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा देश आता करत आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्रात प्रसिद्ध वृत्तात चीन किती भयभीत झाला आहे हे स्पष्ट होते.

‘ग्लोबल टाइम्स’चे मुख्य संपादक हू शिजिन म्हणाले, ‘लष्कराचे संपूर्ण स्थितीवर दृढ नियंत्रण आहे, असे सीमेवरील स्थितीबाबत माहिती असलेल्या लोकांनी मला सांगितले आहे. युद्ध झाल्यास ते कसे लढले जाते यामुळे काही फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर दोन्ही देशांच्या सीमेवर चीन आपली एक इंचही जमीन गमावणार नाही, याबाबत आम्ही चिनी नागरिकांना आश्वस्त करतो.’

दुसरीकडे, सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारताचे एलएसीवरील पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडे वर्चस्व आहे. त्याच्या प्रत्युत्तरात सरोवराच्या उत्तरेला चीनचे सैनिक फिंगर-४ पर्यंत आले आणि त्यांनी तेथून फिंगर-८ पर्यंत अनेक बांधकामे केली.

चालबाजी : युद्धाचा सराव सुरू

पीएलएने सैनिक व अवजड शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवली असून ते युद्धाचा सराव करत आहेत, असा दावा ‘ग्लोबल टाइम्स’ने केला आहे. हवाई संरक्षण, सशस्त्र वाहने, पॅराट्रूपर, विशेष दल आणि पायदळातील सैनिकांना देशभरातील भागांतून बोलावून या भागात तैनात करण्यात आले आहे. एअरफोर्सचे एच-६ बॉम्बर आणि वाय-२० मालवाहू विमाने प्रशिक्षण मोहिमेसाठी येथे तैनात करण्यात आली आहेत.