आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo china Border Tension : Minister Of State For Home Affairs Claims In Parliament ... No Infiltration On Chinese Border In Six Months; Outside, The Congress Launched An Attack ... Did The Galwan Clash Take Place In The Chinese Border?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमावाद:संसदेत गृह राज्यमंत्र्यांचा दावा...सहा महिन्यांत चीनचीसीमेवर घुसखोरी नाही; बाहेर काँग्रेसने चढवला हल्ला...गलवान चकमक चिनीहद्दीमध्ये झाली का?

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने लेहमध्ये लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
  • काँग्रेसचा आरोप : गलवान चकमकीनंतर 4 दिवसांनी सरकारने चीनमधील बँकेकडून घेतले कर्ज
  • मॉस्काेत परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीआधी चीनने आपल्या सैन्याला आधी युद्धासाठी अलर्ट केले होते...बैठकीनंतर हा अलर्ट मागे घेण्यात आला

उत्तर लडाखमध्ये चिनी सीमेवरील तणावाच्या स्थितीवर संसदेत चर्चा झाली नाही तरी या मुद्द्याचे रूपांतर राजकीय वादात झाले. संरक्षणमंत्री बुधवारी राज्यसभेत याप्रकरणी सरकारी बाजू मांडतील, अशी अपेक्षा होती. त्यांचे वक्तव्य गुरुवारपर्यंत टळले, पण त्यापेक्षा जास्त चर्चा गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उत्तराची झाली. राय यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, गेल्या ६ महिन्यांत भारत-चीन सीमेवर घुसखोरी झाली नाही. उलट या काळात जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेवर घुसखोरीच्या ४७ घटना घडल्या. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहाबाहेर काँग्रेसने हल्ला केला. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य नासीर हुसेन आणि प्रवक्ता पवन खेडा पत्रपरिषदेत म्हणाले की, राय यांचे वक्तव्य गलवान खोऱ्यातील चकमकीत शहीद झालेल्या सैनिकांचा अपमान आहे. चीनने घुसखोरी केली नसेल तर गलवानमधील चकमक चीनच्या सीमेत झाली आहे आणि आपल्या सैनिकांनी एलएसीचे उल्लंघन केले, असे सरकारला म्हणायचे आहे का? भारताने बीजिंगमधील एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेकडून ९,२०२ कोटी रुपयांची दोन कर्जे घेतली. दुसरे ५,५२१ कोटींचे कर्ज गलवान चकमकीनंतर १९ जूनला घेतले हे सरकारने सभागृहात मान्य केले आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

मॉस्काेत परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीआधी चीनने आपल्या सैन्याला आधी युद्धासाठी अलर्ट केले होते...बैठकीनंतर हा अलर्ट मागे घेण्यात आला

गेल्या महिनाअखेरीस भारतीय सैन्याने हुसकावून लावल्यानंतर एलएसीवर तैनात चीनच्या सैन्याला युद्धास तयार राहण्याचा अलर्ट देण्यात आला होता. चीनच्या ‘साऊथ चायना पोस्ट’ या वृत्तपत्रातील वृत्ताच्या हवाल्याने सूत्रांनी हा दावा केला. मॉस्कोत दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांत झालेल्या बैठकीनंतर मात्र हा अलर्ट शिथिल करण्यात आला, असे या वृत्तात म्हटले नमूद केले आहे.

दावा : २० दिवसांमध्ये चीन-भारत यांच्यात तीनदा गोळीबार

एलएसीवर दोन्ही देशांत २० दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. हा दावा एका वृत्तात करण्यात आला. सैन्याच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार वृत्तात म्हटले आहे की, पहिली घटना २९ ते ३० ऑगस्टदरम्यान, दुसरी घटना ७ सप्टेंबरला मुखपरी शिखराजवळ आणि तिसरी ७ सप्टेंबरला पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर घडली.

‘ब्रिक्स’च्या एनएसएची बैठक आज :

ब्रिक्स देशांचे एनएसए गुरुवारी व्हर्च्युअल बैठक घेतील. तीत भारतीय एनएसए अजित डोभाल व चीनचे स्टेट कौन्सिलर यांग जिएची हेही भाग घेतील.

सर्वपक्षीय बैठकीतही चीनवर चर्चा नाही

सरकारने बुधवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत वेळेचा अभाव आणि विधेयकांवर चर्चा झाली. संरक्षणमंत्री गुरुवारी भारत-चीन सीमा तणावावर राज्यसभेत वक्तव्य देतील, असे तीत ठरले. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, चीनवर चर्चा झाली नाही. काही विधेयकांची तपासणी करून घ्यावी, असे सरकारला सांगितले.

सैन्याने बोफोर्स तोफा केल्या सज्ज

एलएसीवरील तणाव पाहता भारतीय सैन्याने बोफोर्स हॉवित्झर तोफा कारवाईसाठी सज्ज केल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, तज्ञांच्या एका पथकाने लडाखमध्ये या तोफांच्या देखभालीसाठी दौरा केला होता.

उत्तराखंड सीमेवर चीन सक्रिय

उत्तराखंड सीमेवर चीनने आपल्या सीमेत तिनकार-लिपू खिंडीजवळ झोपड्यांसारखे बांधकाम केले आहे. जोजो गाव, चंपा मैदानाच्या भागात चीनने बांधकाम सुरू केले आहे. जोजो गाव नेपाळच्या के तिनकार-लिपू खिंडीपासून ७-८ किमी दूर आहे.

शेजाऱ्यांशी संबंध खराब केले नाहीत : परराष्ट्र मंत्रालय

संसदेत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले की, चीन, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, म्यानमार आणि नेपाळशी अलीकडे संबंध बिघडले नाहीत. शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

सरकार लष्करासोबत आहे की चीनसोबत : राहुल गांधी

राहुल म्हणाले, क्रोनाॅलॉजी पाहा... पीएम म्हणाले, कुणीही हद्दीत घुसले नाही, चिनी बँकेकडून कर्ज घेतले. मग संरक्षणमंत्री म्हणाले, चीनने अतिक्रमण केले. आता गृह राज्यमंत्री म्हणतात अतिक्रमण झाले नाही. सरकार लष्करासोबत आहे की चीनसोबत?