आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indo China Border Tension Updates : India Amry, People Liberation Army Ready To Withdraw From Pangong Tso Lake Fingers

भारत-चीन सीमावाद:भारत-चीन लडाखमधून तीन टप्प्यांत सैन्य माघारी घेणार, लष्कराच्या कमांडरस्तरीय चर्चेचे फलित

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान एकमत

पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान एकमत झाले आहे. युद्धसामग्रीसह त्यांचे लष्कर एका आठवड्यात मागे हटवण्याच्या भारतीय सूत्रावर चीन राजी झाला. या मसुद्यावर ६ नोव्हेंबरला सैन्य कमांडरदरम्यान झालेल्या आठव्या टप्प्यातील बैठकीत एकमत झाले होते.

सूत्रांनी सांगितले की, तीन टप्प्यात दोन्ही देशांची सैन्ये एप्रिल-मेमध्ये तैनात असलेल्या ठिकाणावर परत जातील. यादरम्यान प्रत्येक टप्प्याचा आढावा घेतला जाईल आणि नंतर पुढचे पाऊल टाकले जाईल.

असे असतील तीन टप्पे

पहिला : रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने एक दिवसात सीमेपासून मागे नेली जातील. चीन सरावाच्या नावाने येथे ती तैनात केली होती.

दुसरा : पेंगाँग त्सोच्या उत्तर भागाकडून चिनी लष्कर फिंगर ८ च्या स्थितीवर परतेल, तर भारतीय जवान धनसिंह थापा पोस्टजवळ.

तिसरा : कैलास रेंजवरून भारतीय जवानांची समोरासमोरील तैनाती मागे. येथे भारतीय लष्कर २९-३० ऑगस्टच्या रात्री तैनात झाले होते.

बातम्या आणखी आहेत...