आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China Dispute | India On US President Donald Trump Mediation Offer Over India China LAC Ladakh Border Dispute

भारत-चीन विवाद:ट्रम्प म्हणाले - मी मोदींशी बोललो, चीनबरोबरच्या सीमेवरील वादात ते नाखुश; भारत म्हणाला - दोघांमध्ये औषधावर 4 एप्रिल रोजी शेवटची चर्चा झाली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
  • ट्रम्प यांच्या मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावावर भारत म्हणाला - शेजाऱ्यांशी बोलणी करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू

भारत-चीन सीमा तणावाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य भारताने फेटाळले आहे. माझे आणि पंतप्रधान मोदींचे बोलणे झाले आणि चीनबरोबरच्या सीमेवरील वादावरून ते नाखुश असल्याचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचा पुनरूच्चार केला.

दरम्यान, वृत्तसंस्थेने शुक्रवारी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, मोदी आणि ट्रम्प यांच्यात सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. दोघांमध्ये 4 एप्रिल रोजी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधावर शेवटची चर्चा झाली होती.

ट्रम्प म्हणाले - भारत खुश नाही

ट्रम्प म्हणाले की, "भारत आणि चीन यांच्यात मोठा वाद सुरू आहे. मी तुमच्या पंतप्रधानांनी पसंत करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत-चीनमध्ये मोठा वाद आहे. दोन्ही देशांची जवळपास 1.4 अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांकडे शक्तीशाली सैन्य आहे. याप्रकरणाबाबत भारत खुश नाहीये आणि चीनदेखील याबाबत आनंदी नसू शकतो."

  ट्रम्प यांना त्यांच्या मध्यस्थीच्या ट्विटबाबत प्रश्न विचारण्यात आले. ते म्हणाले, "मदतीसाठी विचारणा केल्यास मी ती करेन." याआधी बुधवारी ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, "आम्ही भारत आणि चीनला सांगितले आहे की अमेरिका या दोघांच्या सीमा विवादात मध्यस्थी करण्यास तयार आहे."

ट्रम्प यांच्या प्रस्तावावर भारताने म्हटले - चर्चेद्वारे हा वाद सोडवू

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ट्रम्प यांच्या प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयाने म्हटले की, शेजाऱ्यांशी या विषयावर शांततेने तोडगा काढण्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याविषयी बोलले होते, ज्याला भारताने नाकारले होते. हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही भारताने म्हटले होते.

0