आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China Dispute | It Is Difficult For The Troops To Retreat In East Ladakh; Constant Patrols, Verification Required

चीनशी वाद:पूर्व लडाखमध्ये सैनिकांचे मागे हटणे कठीण; सतत गस्त, पडताळणी हवी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनशी तणाव असतानाच गुरुवारी लेहच्या रहिवासी भागात सैन्याची गस्त.
  • सैन्याची भूमिका; संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख आज दौऱ्यावर
  • लष्कराची अडचण : पँगॉग सो, देपसांगमध्ये माघारीचा मोठा पेच

पूर्व लडाखमध्ये सैनिकांना पूर्णपणे मागे घेण्याची प्रक्रिया कठीण आहे. त्यासाठी सातत्याने सुरक्षा आणि शेजारी देशाच्या सैन्य तैनातीबाबत पडताळणी करावी लागणार आहे. दिवस-रात्र सतत डोळ्यात तेल घालून भारतीय लष्कराला सीमेवर प्रतिकार करावा लागेल. म्हणूनच दोन्ही देशांत सैन्य कमांडर पातळीवर बैठक झाली. बैठकीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. पहिला मुद्दा : सैनिकांना मागे हटण्यासाठी पहिल्या टप्प्यातील पद्धती, दुसरा मुद्दा : या पद्धतींवर वास्तविकपणे किती अंमलबजावणी झाली? तिसरा : सद्य:स्थिती, चौथा मुद्दा : दोन्ही बाजूने सैनिकांनी माघार घ्यावी यासाठी कोणती पद्धती असू शकते यावर चर्चा झाली. दोन्ही बाजूने सातत्याने कूटनीती व सैन्याच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. माघार घेण्याच्या दृष्टीने अडचण पँगॉग सो व देपसांगमध्ये दिसून येते. येथे चीन पूर्वस्थितीमध्ये जात नाही. दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लडाखचा दौरा करतील. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख एम.एम. नरवणेही असतील.